Shrigonda Political News : नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे नेला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्हा विकासकामाच्या बाबतीत पाच वर्षे पुढे नेऊन ठेवल्याचे प्रतिपादन भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, ‘योग्य लोकप्रतिनिधी जेंव्हा निवडून येतो तेंव्हा, त्या लोकप्रतिनिधींचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला नक्की होत असतो. नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे नेला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकासकामाच्या बाबतीत पाच वर्षे पुढे नेऊन ठेवला.’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांची कामे नगर जिल्ह्यात झाल्याचे सांगत कोळगावसाठी 33 कोटी रुपयांचा निधी विकास कामासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.
साकळाई योजनेसंदर्भात अनेक वर्ष राजकारण करण्यात आले. अनेकांची भाषणे झाली. मात्र आमदार बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले तसेच खासदारकीच्या माध्यमातून साकळाई योजनेबाबत पाठपुरावा केला. साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे सांगत जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळेल. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे विखे यांनी सांगितले.
गावाच्या विकासात भर पडायची असेल तर रस्ते झाले पाहिजे. रस्ते झाल्याने दळणवळण वाढते. त्यातून गावाच्या विकासाला प्रारंभ होतो. येत्या तीन ते चार महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांचे स्वरूप बदलून जाईल, असे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, सरपंच पुरुषोत्तम लगड, माया मेहेत्रे, उपसरपंच विश्वास थोरात यावेळी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
श्रीगोंदासह मतदार संघातील सर्व विकास कामांवर आगामी काळात भर दिला जाणार आहे. यासाठी सरकार वचनबद्ध आहे. राज्य आणि केंद्र सरकार हातात हात मिळवत राज्याचा व देशाचा विकास करीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे चित्र व्यापक पद्धतीने बदलत आहे.
अशात योग्य उमेदवार निवडून आला तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण आता श्रीगोंदा आणि नगर जिल्ह्यातील मतदारांना बघायला मिळाले असेल, असे डॉ. विखे यावेळी म्हणाले. नगर जिल्ह्यात विकासाची कामे अव्याहतपणे अशीच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडणार नाही, याची ग्वाही देखील खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.