Pune Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रा काढली असून ती सध्या पुणे जिल्ह्यात आहे. मावळात असलेल्या या यात्रेत आमदार सुनील शेळके यांना अश्रू अनावर झाले. तर त्यांना सावरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धाव घेतली.
त्यावेळी स्टेजवर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी आमदार शेळके २०१९ मधील झालेल्या निवडणुकीच्या घटनांना उजाळा देत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल झाला आहे. सर्व पक्षांच्या संवाद यात्रा राज्यभर फिरत आहेत. या यात्रांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परिणामी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जनसन्मान यात्रेतून अजित पवार Ajit Pawar लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा प्रसार करत आहेत. तसेच महिलांशी ठीक ठिकाणी थांबून आर्वजून संवादही साधत आहेत.
राष्ट्रवादीची ही जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात होती. त्यावेळी आयोजित सभेत बोलताना शेळके भावूक झाले. तर सुनील तटकरे यांनी शेळकेंची पाठ थोपटून सावरले. शेळके म्हणाले, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आयाबाहिणींनी आशीर्वाद दिले. बारक्या-सारक्या कच्च्या-बच्च्यांनी सांगितलं, की अण्णांना मतदान केले पाहिजे. तो दिवस आजही आठवतो, असे सांगताना शेळकेंना अश्रू अनावर झाले. यावेळी तटकरेंनी शेळकेंची पाठ थोपटली. यावेळी उपस्थितींनी एकच जयघोष केला.
काही मंडळी टीका टिप्पणी करतात, आरोपही करतात. मला त्या आरोपांचे काही वाटत नाही. माझा बाप कष्ट करतो. भाऊ कष्ट करतात. बायको सावलीसारखी उभी आहे. माझे सहकारीही माझ्यासोबत आहेत. आया बहिणींचे पाठबळ आणि आशीर्वाद आहे, असे म्हणतानाही शेळके Sunil Shelke भावूक झाले.
आज सांगतो की, हा भूमिपूत्र तुमचा पैसा मला नको. तुमचा मान सन्मान नको. ज्या दिवशी सुनील शेळके तुमचा पैसा माझ्या दाराच्या आत आणेन त्या दिवशी तुमची दारे माझ्यासाठी बंद होतील, याची जाण आहे. जो पर्यंत मी तुमच्याशी प्रामाणिक आहेत. तो पर्यंत तुम्ही माझ्याशी विश्वासाने राहा, असेही आवाहन सुनील शेळके यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.