Narhari Jirwal : नरहरी झिरवाळ कोणाकडे? उद्याच्या दिंडोरीतील सभेत समजणार

NCP meeting at Narhari Jirwal Dindori : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावर असून, तिथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठकी घेत आहेत. या बैठकांना आमदार नरहरी झिरवाळ अनुपस्थित असल्याचे समोर आले आहे.
Narhari Jirwal
Narhari JirwalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निफाड आणि दिंडोरीमधील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असतानाच आमदार नरहरी झिरवाळ यांची अनुपस्थिती खटकत पुढे आली. खासदार तटकरे यांनी यावर सावरासावरी करत नरहरी झिरवाळ कोणाकडे हे उद्या दिडोंरीत स्पष्ट होईल. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांची पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट होण्यासाठी अवघे काही तास राहिलेत.

"आमदार नरहरी झिरवाळ यांना आजच्या बैठकीला बोलवलेच नव्हते. तसे अपेक्षित देखील नव्हते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित न राहणे, याचा अर्थ वेगळा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काही नॅरेटिव्ह सेट केले जात आहे. बातम्या पेरल्या जात आहेत. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतो आहे. विधान परिषद निवडणुकीला देखील तेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आमचा उमेदवार पडणार, असा नॅरेटिव्ह सेट केला जात होता. पण पहिल्या फेरीतच आम्हाला सात मतं जास्त मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ आहे. विधानसभा निवडणुकीत ते अधिक स्पष्ट होईल. आमदार नरहरी झिरवाळ नेमकं कोणाकडे आहे, हे उद्या दिडोंरीमधील सभेत स्पष्ट होईल", असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

Narhari Jirwal
Ajit Pawar Politics: आश्चर्य...जिल्ह्यात जागा १५, अजित पवार गटाला हव्यात १२!

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर असलेले नरहरी झिरवाळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून लांब आहेत. यातच त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरीतून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.शरद पवार यांच्या कार्यक्रमात पुण्यातील आमदार चेतन तुपे उपस्थिती लावली. अजित पवार गटात ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी काही कार्यक्रम सामाजिक असतात. व्यासपीठावर एकत्र गेले, म्हणजे विचार बदलेले असे होतं नाही. चेतन तुपे राष्ट्रवादीबरोबरच आहेत, असे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले.

Narhari Jirwal
Teachers strike movement : सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार; मराठा- ओबीसी वादानंतर आता राज्यात 'जुनी पेन्शन'चा मुद्दा तापणार

जागा वाटपासाठी समन्वय समिती

महायुतीच्या जागा वाटपाबाबत शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली. महायुतीमध्ये जागा वाटपासाठी आम्ही एक समन्वय समिती नेमत आहोत. राज्यात महायुती एकत्रित नियोजन करत आहे. त्यामुळे जागा वाटपाचा कितीही पेच निर्माण झाल्यास, तो महायुतीत सोडवलाच जाईल, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

जागा वाटप चित्र स्पष्ट होणार

महायुतीमधील जागा वाटपावर पुढील दोन दिवसांत सविस्तर चर्चा होईल. या चर्चेनंतरच जागा वाटपचा तपशील पुढे येईल. महायुतीत जागा वाटपात कोणतेही मतभेद नाहीत. निवडून येण्याची क्षमता, सीटिंग या सर्व गोष्टींची निर्णय आम्ही बैठकीत घेणार आहोत. महायुती भक्कम असल्याने स्वबळावर निर्णय घेण्याची प्रश्न उद्भवत नाही. प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहू शकते. त्यावर तोडगा काढला जाईल. महायुती सरकारने क्रांतीकारी योजनांची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्याला विधानसभेत जाण्याची संधी मिळेल, अशी भावना धरून आहे. त्यात वावग देखील नाही, असेही खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com