Maharashtra Politics : राज्य सरकारकडून गरिबांच्या वस्तूंत मापात पाप!

Supply Department increase items but reduce the weight-राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधामध्ये वस्तू वाढवताना पुरवठा विभागाने केली वजनात घट
Maharashtra Government Anandacha Shidha
Maharashtra Government Anandacha ShidhaSarkarnama
Published on
Updated on

संतोष विंचू

Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे सरकारने सणासुदीला गरिबांना गोड-धोड करता यावे, यासाठी शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली. मात्र, असे करताना यंदा त्याच्या वजनात घट झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. (Opposition Parties will creiticized state Government On Supply of Foods)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आनंदाचा शिधा योजना (Maharashtra Government) सुरू केली. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) त्याविषयी सातत्याने किती लोकांना लाभ मिळाला याची माहिती सतत देत असतात. मात्र, यंदा ऐन दिवाळीत त्या वस्तूंच्या वजनात घट झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maharashtra Government Anandacha Shidha
Girish Mahajan Called Manoj Jarange : गिरीश महाजन स्पष्टच बोलले, मराठा समाजाने सरकारला आणखी वेळ द्यावा!

रास्त भाव दुकानांमार्फत वितरण

नाशिक जिल्ह्यासाठी आनंदाचा शिधा 'जस्ट किचन' कंपनी मार्फत पुरवठा होणार आहे. आजपासून येत्या ३० ऑक्टोबर या कालावधीतच लाभार्थ्यांना हा संच वितरित करण्यात येईल. सर्व रास्त भाव दुकानदारांमार्फत त्याचे वितरण होईल.

जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख ७४ हजार ९०३, तर प्राधान्य शिधापत्रिकाधारकांची संख्या सहा लाख ४२ हजार ९४६ अशी आठ लाख १७ हजार ८४९ इतकी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मागणी केल्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने सात लाख ९५ हजार ४३६ शिधा संच जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत.

यामध्ये शिधापत्रिकाधारकांना चारऐवजी सहा शिधावस्तूंचा संच देण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दोन वस्तूंत वाढ करताना शासनाने चार वस्तूंचे वजन एक किलोवरून अर्धा किलोवर घटविले आहे. त्यामुळे विरोधकांना हा चांगला राजकीय मुद्दा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयावरून विरोधकांनी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.

Maharashtra Government Anandacha Shidha
Maratha Dhule Politics : सरकार आणखी किती बळींची वाट पाहते आहे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com