Supriya Sule Politics: सुप्रिया सुळे यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खुले आव्हान!

Supriya Sule Open Challenge to Devendra Fadnavis : दंगलींबाबत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.
Supriya Sule & Devendra Fadanvis
Supriya Sule & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची अक्षरशः चिरफाड केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांना खुले आव्हान दिले.

खासदार सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिककरांची फसवणूक केली, असा गंभीर आरोप केला. त्यांनी नाशिक दत्तक घेतले होते. त्यानंतर दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? यावर भाष्य करण्याचे फडणवीस का टाळतात असा प्रश्न त्यांनी केला.

सत्तेत बसलेले नेतेच बेजबाबदार विधाने करतात. समाजात अशांतता पसरेल, अशी चिंथावणी देतात. याला काय म्हणावे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली काही विधाने अतिशय गंभीर आहेत. नाशिकसह अन्यत्र घडलेल्या अशांततेला अशी विधाने कारणीभूत ठरली, असा दावा त्यांनी केला.

दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सडकून काढण्याची भाषा केली होती. रस्त्यावर उतरणे आणि हाणामारी करण्याची भाषा सत्याधारी नेतेच करतात. नाशिकसह जळगाव, धुळे आदींसह राज्यात अन्यत्र अशांतता निर्माण झाली. त्याला सत्ताधारी पक्षाची ही वृत्ती आणि वक्तव्य तेवढेच कारणीभूत आहे.

Supriya Sule & Devendra Fadanvis
BJP Politics: कांदा खरेदीत सावळागोंधळ, भाजपच्या कोणत्या नेत्यांवर संशयाची सुई?

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मी कर्तुत्ववान व्यक्ती समजत होते. मात्र, ते तर कॉपी करून पास झालेले वाटतात. उपमुख्यमंत्री नागपूर येथील आहेत. तेथील ठाण्यात पोलीस जुगार खेळत असल्याचे दिसून आले.

लाडकी बहीण योजनेबाबत आम्ही कधीही राज्य शासनावर टीका केली नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आम्ही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यावर खुल्या चर्चची आहे का?. त्यांनी चर्चेसाठी यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

राज्यातील महायुतीचे सरकार असंवेदनशील आहे. हे सरकार राजकीय पक्ष आणि नेत्यांची घरे फोडण्यात व्यस्त आहे. केंद्र शासनाच्या ईडी, सीबीआय या यंत्रणांकडून नोटीस पाठवण्यात सरकार व्यस्त आहे. त्यामुळे राज्याचे आणि जनतेचे खरे प्रश्न याच्याशी त्यांना काहीही सोयरे सुतक नाही.

Supriya Sule & Devendra Fadanvis
Manoj Jarange: भुजबळांच्या बालेकिल्ल्यात 15 जागांसाठी 150 मराठा उमेदवार इच्छुक; 29 तारखेला जरांगे घेणार निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल? या प्रश्नावर थेट उत्तर देणे खासदार सुळे यांनी टाळले. त्या म्हणाल्या, दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायला आम्हाला वेळ नाही. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष राज्याच्या गंभीर प्रश्नांवर काम करीत आहेत.

रोजगार, महागाई, भ्रष्टाचार यावर आम्ही चर्चा करून उपाययोजनांवर काम करीत आहोत. पदापेक्षा राज्य पूर्वपदावर आणणे याला माझ्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. त्याबाबत महाविकास आघाडीचे सर्वच नेते काम करीत आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणूक सर्वेक्षण सातत्याने वेगवेगळे चित्र निर्माण करीत आहे. यावर देखील खासदार सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मी यातील कोणताच सर्व्हे पाहिलेला नाही. सर्व्हे करणाऱ्या संस्था कोण आहेत, हे देखील पाहिले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाच्या सर्व्हेचा अनुभव मी घेतला आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com