Eknath khadse News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी बुधवारी चोरी झाली. चोऱ्या अनेक होतात. मात्र एकनाथ खडसे यांच्याकडे झालेली चोरी की, राजकीय हेतूने घडवलेली घटना, असा संशय व्यक्त होत आहे.
या चोरीबाबत खुद्द माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन याविषयी शंका व्यक्त केल्या आहेत. आता पोलिसांशी समन्वय ठेवून पुढे कारवाई होणार आहे.
माजी मंत्री खडसे यांच्या घरी झालेली चोरी अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. या चोरीत चोरट्यांनी मौल्यवान वस्तूं एवढेच नेमके घोटाळ्याचे पेन ड्राईव्ह, सीडी आणि कागदपत्रे आपल्याबरोबर नेली. त्यामुळे कागदपत्र चोरणारे जळगावचे हे चोर असतील तरी कोण?
जळगाव आणि राज्याच्या राजकारणात माजी मंत्री खडसे यांचे अनेक राजकीय शत्रू आहेत. विशेषतः सत्ताधारी नेते नेहमीच श्री खडसे यांच्या रडारवर असतात. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी मंत्री आणि श्री खडसे यांच्यातील जुगलबंदी हा बातम्यांचा विषय असतो.
श्री खडसे यांनी विधानसभेत आणि जाहीरपणे एका मंत्र्यावर थेट वैयक्तिक आरोप केले होते. या मंत्र्याची सीडी आणि पेन ड्राईव्ह जाहीर करणार असे ते बोलले होते. त्यावरून या दोन्ही नेत्यांतील राजकीय वाद कौटुंबिक आणि वैयक्तिक स्तरावर पोहोचला होता.
खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीची कार्यपद्धती देखील वादग्रस्त आहे. संबंधित चोर मध्यरात्री १.५४ मिनिटांनी घरात शिरले. त्याआधी आश्चर्यकारकरीत्या परिसरातील पथदीप बंद झाले. चोरांचा वावर अतिशय सराईत होता. ते ३.१५ वाजता घरातून बाहेर पडले. मोटार सायकलवर पसार झाले.
त्यांनी खडसे यांच्या बेडरूम मधील मोठ्या ड्रॉवरमध्ये असलेले कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या १६०० कोटींच्या पाटबंधारे विभागाच्या निविदांची कागदपत्रे होती. ही कागदपत्रे चोरल्याने कोणत्या मंत्र्याचे आणि श्री खडसे यांच्या विरोधकांचे भले होणार होते, असे तर्क लढवले जात आहेत.
अनेक चित्रपट, राजकीय घटना, रहस्य कथा यामध्ये कागदपत्रांची चोरी होत असते. ती का होते याचे स्पष्टीकरण त्यात असते. चित्रपटाला शोभेल अशीच चोरी माजी मंत्री खडसे यांच्या घरी झाल्याचे जाणवते. यामध्ये राजकीय दृष्ट्या कोणाचा फायदा होणार होता, हा गंभीर विषय आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.