Raju Shetty : माझा `इंडिया` आणि `एनडीए` दोघांशीही संबंध नाही!

Swabhimani Shetkari Sanghtana`s leader Raju Shetty will go alone-माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, २०१९ मध्ये सोबत गेलो तेव्हा आमच्याशी संवाद साधला नव्हता.
Raju Shetty
Raju ShettySarkarnama
Published on
Updated on

Raju Shetty News : देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची `एनडीए` आणि विरोधकांची `इंडिया` अशा दोन आघाड्यांत राजकीय पक्षांची विभागणी होताना दिसते आहे. मात्र स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपण दोन्हींकडे जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Raju Shetty clarify that he will not go with NDA nor INDIA)

राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी २०१९ मध्ये आम्ही राजकीय आघाडीत जाण्याचा निर्णय ऊसाच्या `एफआरपी`साठी घेतला होता. मात्र त्यावेळी निर्णय घेताना आम्हाला कोणीही विश्वासात घेतले नव्हते.

Raju Shetty
Irshalwadi Landslide: शेट्टींचा दावा, इर्शाळवाडी दुर्घटनेत ७० ते ८० लोकांचा बळी?

माजी खासदार शेट्टी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही कोणत्याही आघाडीसोबत जाणार नाही. दोन्ही आघाड्यांशी आमचा काहीही संबंध नाही. २०१९ मध्ये सोबत गेलो तेव्हा उसाच्या `एफआरपी`चा निर्णय घेतला तो चुकीचा होता. आमच्याशी संवाद साधला नाही.

ते पुढे म्हणाले, भूमीलेखाचा कायदा करतांना तसेच जमिनी अधिग्रहित करतांना `मविआ`ने त्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राजकीय नेते सत्ता नसतांना शेतकऱ्यांच्या बाजून असतात, पण सत्तेत गेल्यावर शेतकऱ्यांच्या विरोधात जातात.

Raju Shetty
DCM Ajit Pawar यांनी घेतला दुर्घटनेचा आढावा, कोणतीच यंत्रणा पोहचू शकत नाही | Irshalgad Landslide

सध्याचे चित्र तर अत्यंत गंभीर व चिंताजनक झाले आहे, असे शेट्टी यांनी सांगतिले. ते म्हणाले, कोण कधी फुटेल माहिती नाही, अजून देखील वेळ आहे. मतदार या सगळ्यांना सोडून नवीन आश्वासक चेहरा निवडून देतील असे मला वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com