NCP News; नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नाशिक पोलिसांकडे होतोय पाठपुरावा.
Ambadas Khaire
Ambadas KhaireSarkarnama

नाशिक : (Nashik) नायलॉन मांजाच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या मांजामुळे अनेक जीवघेणे अपघात होतात. मात्र अद्यापही त्यावर नियंत्रण आलेले नाही. त्यामुळे याबाबत पोलिसांनी (Police) पुढाकार घ्यावा आणि नायलॉन मांजाची खरेदी विक्री करणाऱ्यांवर मोक्का अन्वये कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी केली आहे. (NCP will take followup for action against ugly Nylon thread salers)

Ambadas Khaire
Womens Politics; शेतात राबता, राबता कुसुम चव्हाणके झाल्या गावच्या कारभारी!

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पाठपुरावा केला जाणार नाही. त्यासाठी शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरात पतंगप्रेमींमध्ये देखील जनजागृती केली जाणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

Ambadas Khaire
Amruta Fadanvis : "अक्कल कमी, जीभ लांब" ; अमृता फडणवीसांवर काँग्रेसचा निशाणा

मकर संक्रात जवळ येत आहे. यानिमित्ताने पतंगोत्सव साजार केला जातो. पतंगप्रेमी त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा मांजा वापरतात. शहरात व जिल्ह्यात पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.

मागील काही वर्षापासून जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर वाढत आहे. जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांना आजपर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येक जण जखमी झाले आहेत. न्यायालयाचा बंदी आदेश असतानाही तो पाळला जात नाही. बंदी आदेश झुगारून शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे.

शहरात नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने अनेक ठिकाणी या जीवघेण्या मांजाची सर्रास विक्री होताना पहावयास मिळते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असताना देखील प्रशासन ठोस पावले उचलताना दिसत नाही. मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. धारदार नायलॉन मांजामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना आहेत.

संक्रांतीच्या काळात हजारो पक्षी नायलॉन मांज्यामुळे पंख व मान कापून मृत पावतात. रस्त्यावर दुचाकीधारकाना यामुळे अपंगत्व आलेले आहे. बाजारात नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जाते, मात्र तरीही त्याची विक्री सर्रास सुरु आहे. शहरात या बेकायदेशीर कृत्याला खतपाणी मिळत असल्याने यावर तात्काळ बंदी आणावी. नायलॉन मांजाची विक्री करण्यासह खरेदी करणाऱ्यांवर देखील `मोक्का` अंतर्गत कारवाई करण्यात यावी, जेणेकरून विक्री करणारा व खरेदी करणाऱ्यांवर धाक निर्माण होईल, असे श्री. खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com