नाशिक : एसटी (MERTC) महामंडळाच्या विलीगीकारणासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी असभ्य वर्तन केले. त्यांना फूस लावून त्यांची माथी भडकवणाऱ्यां राजकीय पक्ष व व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली.
यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, संजय खैरनार, माजी नगरसेवक जगदीश पवार आदि उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना अचानक आंदोलनकर्त्यांच्या एका समूहाने शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचून असभ्य वर्तन करत धुडगूस घातला. शांततेत पार पडणाऱ्या आंदोलनाला शेवटच्या दिवशी अचानकपणे हिंसक वळण देण्यात आले. काही राजकीय पक्षांना महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असून त्यामुळे ते असे घाणेरडे राजकारण करत आहे.
केंद्र सरकारच्या मदतीने महाविकास आघाडीतील नेत्यांवर इडीची कारवाई घडवून आणली जात आहे. या आंदोलनकर्त्यांना फूस लावून त्यांची माथी भडकवणाऱ्यांचा खरा सूत्रधार कोण याचा शोध घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसह धूडगूस केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, प्रशांत वाघ, विनोद देशमुख, सुरेखा निमसे, कुंदा सहाणे, रुपाली पठारे, विक्रम कोठुळे, योगेश निसाळ, गौतम पगारे, चैतन्य देशमुख, राहुल तुपे, जय कोतवाल, सोनू वायकर, संतोष जगताप, संजय पगारे, शंकरभाई मंडलिक, प्रकाश थामेत, सागर शिंदे, योगेश इंगवले, स्वप्नील कासार, मंगेश लांडगे, किरण राक्षे, दत्ता पाटोळे, बापू फडोळ, अविनाश अरिंगळे, रितेश केदारे, शहबाज सैय्यद, प्रथमेश पवार, लक्ष्मण वाल्मिकी, विद्या बर्वे, मीनाक्षी काकळीज, प्रशांत आवारे, वजाहद शेख, नियामत शेख, स्वराज हाके, अभय खालकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.