ACB Trap News; हॉटेलच्या पार्टीसाठी लाच मागणारा तलाठी सेवक अटकेत

सात बारा उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी मागीतली होती तीन हजारांची लाच
ACB trap
ACB trapSarkarnama

नाशिक : (Nashik) खरेदी केलेल्या जमीनीच्या सात बारा उताऱ्यावर वडीलांच्या नावाची नोंद करण्यासाठी तलाठ्याने हॉटेलमध्ये केलेल्या पार्टीचे तीन हजारांचे बील अदा करण्यासाठी लाच मागितली. शेतकऱ्याकडे (Farmers) हॉटेलच्या बिलासाठी पैसे मागणाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. (ACB file a complain against Talarhi for deemands bribe)

ACB trap
Nashik News; शिवसेना सुपरस्टार सुधाकर बडगुजर यांनी सलमान खानलाही मागे टाकले!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या कारवाईत गेले काही दिवस महसूल विभाग आघाडीवर आहे. त्यांची ही आघाडी अद्यापही कायम आहे. आठवडयात सलग दुसऱ्यांदा तलाठयाने लाच मागीतल्याचा प्रकार घडला आहे.

ACB trap
Dada Bhuse News; शिवजयंती सजावटीवरून दादा भुसे आणि अद्वय हिरे वाद पेटला

तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे खरेदी केलेल्या जमीनीच्या कब्जेसदरी सात बारा उताऱ्यावर नावाची नोंद करायची होती. त्यासाठी ते चांदवडच्या तलाठी कार्यालयात सतत पाठपुरावा करीत होते. तलाठी कार्यालयातील तलाठ्यांचे खाजगी मदतनीस रविंद्र कारभारी मोरे यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हॉटेलमध्ये केलेल्या पार्टीचे बील दोन हजार 940 रुपयांची मागणी केली.

यासंदर्भात संबंधीतांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. सापळापुर्व कारवाईत आरोपी लोकसेवक रविंद्र मोरे याने तक्रारदाराकडे हॉटेलच्या पार्टीच्या बिलाचे दोन हजार 940 रुपये देण्याची मागणी केली. ही रक्कम त्याने पंच व साक्षीदारांच्या समक्ष 7 जानेवारी चांदवडच्या तसलाठी कार्यालयात मागणी केली. त्यावरून पथकाने कारवाई केली. याबाबत चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधिक्षक नारायण न्याहाळदे, संदीप घुगे व त्यांच्या पथकाने केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com