Suraj Chavan: 'खा कोणाच पण मटण, पण दाबा घड्याळ्याचं बटन'; अजितदादांच्या नेत्याचं मतदारांना आवाहन

Taloda Municipality Election 2025: आमदार सना मलिक यांच्याकडून उमेदवारांना नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होऊन थांबायचे नाही तर विधानसभेत देखील नंदुरबार मधून राष्ट्रवादीच्या प्रतिनिधित्व यावं अशी इच्छा व्यक्त केली.
Suraj Chavan
Suraj Chavan sarkarnama
Published on
Updated on

Taloda Politics: नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून मतदारांना विविध आश्वासने, प्रलोभन दाखवण्यात येत आहेत. मतदारांना विविध देवदेवतांचे दर्शन घडवून आणल्यानंतर आता प्रचारात दररोज जेवणावळ्या, पार्ट्याचं आयोजन सुरु आहे.

सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली असून आपापल्या नेत्यांना बोलून सभा घेतल्या जात आहे. "खा कोणाच पण मटण, पण दाबा घड्याळ्याचं बटन,"घेतली, राष्ट्रवादीची पहिली जाहीर सभा घेण्यात आली असून राष्ट्रवादीकडून देखील प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.

यावेळी आपल्या भाषणात सुरज चव्हाण यांनी मतदारांना "खा कोणाच पण मटण, पण दाबा घड्याळ्याचं बटन," असे मिश्लिकपणे सांगितले. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

सुरज चव्हाण म्हणाले, "राज्यात सर्वात प्रभावी नेता म्हणून अजितदादाची ओळख आहे. ते निधी देण्यात कुठलीही काटकसर करीत नाहीत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देखील मागणी करणारा एकमेव नेता म्हणजे अजित पवार आहेत,"

Suraj Chavan
Nandurbar Politics: रणधुमाळीत अनोखे द्दश्य: शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे ठाकरेंच्या उमेदवाराने केले औक्षण

आमदार सना मलिक यांच्याकडून उमेदवारांना नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होऊन थांबायचे नाही तर विधानसभेत देखील नंदुरबार मधून राष्ट्रवादीच्या प्रतिनिधित्व यावं अशी इच्छा व्यक्त केली नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या प्राबल्य वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आता प्रचाराच्या मैदानात राष्ट्रवादी देखील उतरल्याने जिल्ह्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तळोद्यात आठ वर्षांनी नगरपालिकेची निवडणूक होत आहे.

श्रीकांत शिंदे यांची रॅली

शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा आरंभ काल नंदुरबारमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या पत्नी रत्ना रघुवंशी यांच्यावरील परिवारवादाच्या आरोपांना उत्तर देताना रघुवंशींनी गावित कुटुंबावर निशाणा साधला.

परिवारवादाचे आरोप करणाऱ्यांचे संपूर्ण खानदान यात गुंतले आहे. त्यांच्या घरात पाच जिल्हा परिषद सदस्य, मुलगी खासदार हिना गावित, दुसरी मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि स्वतः आमदार चालतात,असा आरोप करत त्यांनी गावित कुटुंबीयांना प्रतिप्रश्न केला.

डॉ. विजयकुमार गावित हे सर्व आदिवासींच्या योजनांचा हडप केल्या आहेत, अशी टीका रघुवंशींनी यांनी केली. 'गावित ज्या समाजात जन्मले, त्याचे स्थलांतरण आणि कुपोषण ते थांबवू शकले नाहीत. आदिवासी जिथे आहे तिथेच आहे, फक्त गावित कुटुंब 'व्हीआयपी' झाले आहे,' असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com