Teachers Constituency Election 2024: शिक्षकांना पैसे वाटप करणाऱ्याला ठाकरे गटाच्या नेत्यांनी पकडले!

The person who distributed money for voting was caught : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले..
Teachers constituency Election
Teachers constituency ElectionSarkarnama

Teachers constituency News : शिक्षक मतदार संघासाठी सध्या मतदान सुरू आहे. तीव्र उन्हामुळे मतदानाची गती संथ आहे. दुपारी तीन पर्यंत जिल्ह्यात 66 टक्के मतदान झाले. शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान सुरू आहे. या मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. मतदानासाठी येणाऱ्या शिक्षकांना कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक पद्धतीने आवाहन करताना दिसले.

नाशिक (Nashik) शहरातील भालेकर शाळा मतदान केंद्रावर दुपारी एकला एक कार्यकर्ता मतदारांना पैसे वाटप करत असल्याची तक्रार होती. शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांनी त्याला पकडले. त्याच्या बॅगेत 65 पाकिटे पैशांची आढळली. कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत संबंधित कार्यकर्त्याला भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले. मात्र या कार्यकर्त्याचे नाव समजू शकले नाही.

Teachers constituency Election
Shivsena UBT : महाविकास आघाडीकडून शिंदे गटाचा आमदार टार्गेट, पोलिसांच्या कारवाई विरोधात 'एल्गार'

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पैसे वाटप करणारा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचा समर्थक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याच्याकडे दराडे यांचे पत्रक होते, अशी माहिती ठाकरे गटाचे विभाग उपप्रमुख उत्तम कोठुळे यांनी दिली. दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिक विभागात 64.41 टक्के मतदान झाले. यामध्ये 29 हजार 435 पुरुष आणि 15 हजार 242 महिला असे 44 हजार 677 मतदारांनी मतदान केले. नंदुरबार जिल्ह्यात 72.69 टक्के, धुळे जिल्ह्यात 67.42 टक्के, जळगाव जिल्ह्यात 61.13 टक्के, नाशिक जिल्ह्यात 66.11 टक्के आणि नगर जिल्ह्यात 60.42 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी ऊन कमी झाल्यावर ही गती वाढली होती.

Teachers constituency Election
ShivrajSingh Politics : कृषिमंत्री चौहान कांदा प्रश्नासाठी नाशिकला देणार भेट !

बुधवारी सकाळपासून मतदानासाठी मोठी गर्दी होती. दुपारी प्रचंड ऊन असल्याने आणि मतदानाची गती संथ असल्याने अनेक मतदार मतदाना न करता परत गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे मतदानाची गती संथ झाली. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शिक्षक मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी देखील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. आजच्या मतदानामध्ये मोठी चुरस दिसून आली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com