Eknath Shinde : आंदोलनांनी मुख्यमंत्री शिंदे बेजार, आदिवासींबाबत रिस्क घेणं टाळलं!

Nashik Adivasi Morcha Eknath Shinde PESA Meeting : आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी याबाबत चर्चा केली होती. मात्र त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसोबत आंदोलकांची भेट होणार असल्याची माहिती मिळतेय...
Adivasi Andolan Eknath Shinde
Adivasi Andolan Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

JP Gavit News: नाशिक येथील आदिवासी आंदोलन सुरूच आहे. मागण्याबाबत कोणतीही तडजोड करण्यास आंदोलक तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देखील आता सक्रिय झाले आहेत. बुधवारी नाशिक येथे जिल्हाभरातील हजारो आदिवासी बांधवांनी उलगुलान आंदोलन केले. या निर्णायक आंदोलनामुळे सरकारही खडबडून जागे झाले. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी याबाबत चर्चा केली होती. मात्र त्यात कोणताही तोडगा निघू शकला नाही.

आदिवासी विकास मंत्र्यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समवेत शुक्रवारी मुंबईत बैठक होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे शुक्रवारी बैठकीसाठी वेळेत अडचणी होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून आजच आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. माजी आमदार जे. पी. गावित (J P Gavit) यांच्या सोबत प्रमुख आंदोलक मुंबईला रवाना झाले आहेत. आज दुपारी या संदर्भात चर्चा होईल.

Adivasi Andolan Eknath Shinde
J.P. Gavit On CM Shinde : माजी आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंनाच उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात; प्रकरण चिघळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत उद्या वाढवण बंदराचे लोकार्पण आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री उद्या दिवसभर व्यस्त असतील. त्यामुळे आजच बैठक घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाने आंदोलकांना कळविला आहे.

हा विषय प्रामुख्याने आदिवासी विकास मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातील आहे. मात्र आदिवासी विकास मंत्री गावित यांनी सुरुवातीपासून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे गावित यांनी दिलेल्या कोणताही तोडगा किंवा पर्याय आंदोलकांना मान्य नाही. या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्र्यांची आंदोलकांसोबत चर्चा होणार आहे.

Adivasi Andolan Eknath Shinde
PM Narendra Modi Analysis : मोदीजी, उशिरा का होईना समाजाला दिलासा, विश्वास दिलात, हे बरं झालं!

दरम्यान राज्य सरकार पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी उमेदवारांच्या नियुक्तीला स्थगिती देत आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ सांगितला जातो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अशी कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे तातडीने भरती सुरू करावी. आमच्या मागण्या मान्य कराव्या, यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पर्याय देऊ नयेत. असे कोणतेही पर्याय स्वीकारले जाणार नाही, असा ठाम निर्धार माजी आमदार गावित यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या बैठकीत होणारी चर्चा आणि निर्णय याकडे नाशिकमधील आंदोलकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com