Nashik ‘Maratha’ News : नाशिकमध्ये पोलिसांनी केली रात्रभर धरपकड!

The incident of Lathi charged in Jalna has had strong impact across the state-जालना येथे शांततापूर्ण मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.
Maratha Kranti Morcha
Maratha Kranti MorchaSarkarnama

Jalna Maratha Protest : जालना येथे शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सक्रीय झाली आहे. शहर व जिल्ह्यात अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police arrest many social and political workers in Nashik)

नाशिक (Nashik) शहरात मराठा (Maratha) क्रांती मोर्चा तसेच अन्य संघटनांनी काल निदर्शने केली. आज बंदचे आवाहन केले. त्यामुळे पोलिसांनी (Police) धरपकड सुरू केली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते रात्रीतून गायब झाले आहेत.

Maratha Kranti Morcha
Anil Gote News : ‘मराठा’ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले!

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस आयुक्त शिंदे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबाबत राज्याच्या गृह विभागाकडून सर्व आयुक्त कार्यालयांशी संपर्क करून आढावा घेतला जात आहे. त्याबाबत नाशिक शहरातील परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी पोलिस यंत्रणा सजग आहे.

शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही समाजकंटकांची रात्री उशिरा धरपकड केली. काहींना नोटिसा बजावत त्यांच्या हालचालीवर निर्बंध घातले. जिल्हात सिन्नर, चांदवड, कळवण, मालेगाव, निफाड, येवला तालुक्यांत देखील जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पूर्ववत व्हावे याची प्रशासनाला चिंता आहे.

Maratha Kranti Morcha
Maratha Andolan : नाशिक शहरात पोलिसांच्या सायबर सेलकडून ‘वॉच’

नाशिकमध्ये याबाबत आक्रमक झालेल्या संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच मराठा आरक्षणाशी संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. तसेच शहराच्या शांततेला गालबोट लागू नये, यासाठी शहर पोलिसांनी रात्री उशिरा काही समाजकंटकांची धरपकड केल्याचे समजते. तसेच काहींना नोटिसा बजावून घरात नजरकैद केल्याचे समजते. शहराची शांतता तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आणखीही कठोर उपाययोजना राबविण्याचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com