Shinde-BJP Politics: शिंदे गटाने वाढवली भाजपच्या वरिष्ठांची डोकेदुखी; नाशिकमध्ये नक्की काय चाललयं?

Nashik Politics| आगामी निवडणुकांपर्यंत हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Political: एकीकडे शिवसेना(शिंदे गट) - भाजप युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे राज्य सरकारमधील नेते मंडळी सांगत असतात. दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये शिंदे-भाजप (Shinde-BJP Politics) गटातील गटबाजी समोर आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकप्रकारे स्पर्धाचे लागल्याचं दिसत आहेत. अशातच आगामी निवडणुकांपर्यंत हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (The Shinde group has increased the headache of BJP seniors)

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आलेल्या माजी नगरसेवक, आमदार, खासदारांनाही आर्थिक बळ दिले जात आहे. पण नाशिकमध्ये मात्र नाशिक मधील शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांना विकासकामांसाठी निधी देणे, शहरातील धोरणात्मक विषयासंदर्भात निर्णय घेणे आणि त्याचे श्रेय लाटण्याचे सध्या प्रकार सुरू आहे.

Eknath Shinde
JDS Manifesto For Karnataka Election : गर्भवतींना JDS देणार सहा हजार रुपये मानधन, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ..

स्थानिक नगरसेवकांकडून सुरु असलेल्या या एकमेकांच्या प्रभागातील ढवळाढवळ व कामांचे श्रेय लाटण्याच्या तक्रारी आता थेट भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहचल्या आहेत. यामुळे शिंदे-भाजप गटातील गटबाजी वरिष्ठासाठी आता डोकेदुखी ठरु लागली आहे. नाशिकमधील (Nashik news) जवळपास पंधरा ते सोळा प्रभागांमध्ये हा प्रकार सुरु आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत युती होईल का नाही, हे माहिती नसले तरी भाजपचे माजी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांनी कामं केली आहेत आता त्या भागात शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या मुळे दोन्ही गटातील मतभेद आणि श्रेयवादाची लढाई टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Eknath Shinde
Shinde-Fadnavis government : राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 'एवढी' वाढ

काही दिवसांपुर्वी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीची घोषणा केली होती. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता. पण खासदार हेमंत गोडसे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे भाजपमध्ये शिंदे गटाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करायची असेल तर कोणाला काय वाटेल हे पाहत बसले तर संघटना वाढणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतल्याचे बोलले जाते.अशात शिंदे गटाकडून सुरु केलेल्या या श्रेयवादाची वरिष्ठ नेत्यांना तक्रार करण्यासाठी एक गट सक्रीय झाला आहे. शिंदे गटाने अशी अतिक्रमणे सुरु ठेवल्यास ती आपल्याला परवडणारी नाही, अशी तक्रार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra fadanvis) केली जाणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com