Ahmednagar News : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप आणि शेवगाव-पाथर्डीमधील भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या साखर कारखानदारीला धक्का बसला आहे.
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखाना ऊसाच्या पेमेंट थकबाकीपोटी स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा, तर पाथर्डीतील वृद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांनी ठेवला आहे.
शेतकऱ्यांच्या (Farmer) ऊसाच्या गाळपाचे पैसे थकवल्याने श्रीगोंद्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची देणी देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. जगताप सहकारी साखर कारखान्याकडे 21 कोटी तीन लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट देण्यासाठी साखर आयुक्तांनी जप्तीचा आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
माजी आमदार राहुल जगताप कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात ते आहेत. विधानसभा निवडणुकीची त्यांनी तयारी सुरू केली आहे. यातच त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे. साखर आयुक्तांनी 31 मे रोजी जप्तीचा आदेश काढला आहे.
कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे ही रक्कम कारखान्यांची जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन, त्यावर सरकारचे नाव लावून, कारखान्यांकडे जमीन महसुलाची थकबाकी समजून ही जप्त आणि विक्री करून त्यातून शेतकऱ्यांच्या थकीत पेमेंट द्यावी, असे साखर आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या पाथर्डीतील वृद्धेश्वर सहकारी कारखान्याकडे देखील 8 कोटी 14 लाख 44 हजार रुपयांची थकबाकी आहे. अकोल्यातील अगस्ती कारखान्याकडे 13 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची थकबाकी आहे. शेवगामधील गंगामाई कारखान्याकडे 17 कोटी 7 लाख 78 हजार रुपयांची थकबाकी आहे. पद्मश्री विखे कारखान्याकडे 57 लाख 76 हजार, तर नगर तालुक्यातील पियुष शुगरकडे 23 लाख 58 हजार रुपयांची थकबाकी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.