Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; याचिका फेटाळली, गुन्हा दाखल होणार

Supreme Court Rejects Indurikar Maharaj Petition: पुत्रप्राप्ती संदर्भात केलेले विधान इंदुरीकर महाराजांना भोवनार
Indurikar Maharaj
Indurikar Maharaj Sarkarnama

Delhi News: किर्तनकार इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला असून पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला असून इंदुरीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

इंदुरीकर महाराज यांनी एका किर्तनात पुत्रप्राप्ती संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील प्रथम वर्ग न्यायालयाने दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द ठरलला होता. या आदेशाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सत्र न्यायालायाचा आदेश रद्द ठरवला.

Indurikar Maharaj
Pimpri-Chinchwad Protest : संभाजी भिडेंविरोधात शंभरावर संघटना आक्रमक; पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी मोर्चा

हायकोर्टाच्या या निर्णयाला इंदुरीकर महाराजांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावर सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळत हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे इंदुरीकरांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Indurikar Maharaj
West Maharashtra News : मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिकांना ‘बूस्टर डोस’; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

इंदुरीकर महाराजांनी नेमकं काय विधान केलं होतं?

"स्त्री-पुरुषाचा संग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो, आणि जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते", असे विधान एका किर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी केले होते.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com