नाशिक : कारखाना (Sugar Factory) सुरू झाल्यावर बंद होता कामा नये. जबाबदारी केवळ ठेकेदारांची नाही तर शासन, शेतकरी, कामगारांची (Employees) आहे. योग्य नियोजन, तज्ञांचे मार्गदर्शन व उपपदार्थ निर्मिती या गोष्टींकडे चाणक्षाने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिल्यास शेतकरी (Farmers) तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
पळसे येथे नऊ वर्षांपासून बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना खासदार हेमंत गोडसे, छत्रपती शहाजीराजे भोसले व दीपक चंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला असून, कारखाना नूतनीकरण शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले, की कारखाना सुरु झाल्यानंतर गटबाजी, झेंडे धरू नका. हा कारखाना बंद का पडला याचा प्रथम विचार करा. औषध देण्यासाठी रोगाची चिकित्सा होणे गरजेची आहे. कर्तव्यदक्ष लोकांच्या हाती कारखाना जातो आहे. महाआघाडी सरकारच्या माध्यमातून बंद पडलेल्या कारखान्यांना मदत करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी युवराज शहाजीराजे म्हणाले, की छत्रपती घराणे नेहमी शेतकऱ्यांच्या मागे राहिलेले आहेत. ते म्हणाले, काहीही अडचण येवो कारखाना सुरू करणार. केवळ २५ नाही तर ५० वर्ष मदत करू साखर कारखाना निश्चितच चांगली गळीत करून शेतकरी व कामगार यांच्यासह सर्वांचे प्रश्न सोडविणार.
हेमंत गोडसे म्हणाले, की नासाका सुरू व्हावा अशी शेतकऱ्यांची तळमळ, सामाजिक बांधिलकी म्हणून कारखाना सुरू करण्याचे ध्येय होते.
या वेळी सेना उपनेते बबन घोलप, आमदार माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, निवृत्ती डावरे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार हिरामण खोसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कोंडाजी आव्हाड, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, शाहजाद पटेल, दत्ता गायकवाड, सेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दशरथ पाटील, शिवाजी चुंबळे, निवृत्ती अरिंगळे, मुरलीधर पाटील, विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती जाधव, दिनकर आढाव, जिल्हा बँक प्रशासक अरुण कदम, कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, अनिता गोडसे, अजिंक्य गोडसे, सागर गोडसे, भक्ती गोडसे, भाग्यश्री गोडसे, तानाजी गायधनी, रवींद्र मालुंजकर, सुधाकर गोडसे आदी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.