Jaykumar Raval News : ...तर सावरकरांच्या भाषेत उत्तर देऊ!

आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.
Savarkar GauravYatra at Dondaicha
Savarkar GauravYatra at DondaichaSarkarnama
Published on
Updated on

Savarkar Gaurav Yatra News : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ब्रिटिशांनी अतोनात छळ केला. तसे पुरावे आहेत; परंतु काँग्रेसचे नेते राहुल गांधी सावरकरांचा चुकीच्या पद्धतीने नामोल्लेख करतात. त्यांचा अवमान करीत असतात. गांधी यांनी सावरकरांचा अवमान थांबविला नाही, तर त्यांना सावरकरांच्या भाषेत उत्तर देऊ, अशा शब्दांत माजी मंत्री, आमदार जयकुमार रावल यांनी सावरकर गौरव यात्रेनिमित्त कार्यक्रमात खडसावले. (Jaykumar Rawal warns Congress leader Rahul Gandhi on Savarkar issue)

भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) दोंडाईचा (Dhule) येथे बुधवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Svatantryveer Savarkar) गौरव यात्रा निघाली. तिची सुरवात श्रीराम मंदिरापासून सावरकरांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले. काँग्रेसच्या (Congress) सावरकरांवरील विधानांचा त्यांनी समाचार घेतला.

Savarkar GauravYatra at Dondaicha
Vikhe Patil News : वाळू ठेकेदारांची राजकीय लॉबीपुढे अस्तित्वाचे संकट!

दोंडाईचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुनी पालिका इमारत, राजपथमार्गे नंदुरबार चौफुली येथील शिवतीर्थावर यात्रेचा समारोप झाला.

या यात्रेत आमदार रावल, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, ब्राह्मण महासभेचे शैलेश देशपांडे, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, विजय मराठे, संजय मराठे, चिरंजीवी चौधरी, निखिल जाधव, पंचायत समिती उपसभापती रणजित गिरासे, विजय माळी, शकिल खाटीक आदी सहभागी झाले.

Savarkar GauravYatra at Dondaicha
Nashik News : सत्यजीत तांबेंचा औद्योगिक जागेसाठी नवा पर्याय!

आमदार रावल म्हणाले, की सावरकर हे एकमेव क्रांतिकारक होते की त्यांच्यावर सर्वांत जास्त खर्च ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याने केला. त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अंदमानच्या जेलमध्ये त्यांनी सहा हजारांपेक्षा जास्त कविता लिहिल्या.

‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता समाविष्ट होती. सावरकरांनी लंडनमध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. सशस्त्र क्रांतीचा नारा सर्वप्रथम त्यांनीच दिला. अशा थोर स्वातंत्र्यसैनिकांनी आपले देशासाठी जीवन समर्पित केले. असे असताना त्यांच्याशी बरोबरी करू न शकणाऱ्यांना सावरकरांचा अवमान करण्याचा अधिकार नाही. गांधी यांनी सावरकरांची माफी मागावी. आम्ही आज महात्मा गांधींप्रमाणे अहिंसावादी आंदोलन करत आहोत, अन्यथा सावरकरांच्या शब्दांत गांधी यांना उत्तर देऊ, असा इशारा आमदार रावल यांनी दिला. ब्राह्मण महासभेचे शैलेश देशपांडे, प्रवीण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com