Sharad Pawar News; नागालँडमध्ये भाजपला पाठींबा दिलेला नाही!

नागा चळवळीतील संघटनांच्या विघातक चळवळींना पर्याय म्हणून वेगळा प्रयोग झाला.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) नागालँड (Nagaland) राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भारतीय जनता पक्षाला (BJP) पाठींबा दिलेला नाही. त्या राज्यातील एक वेगळा प्रयोग म्हणून मुख्यमंत्री नेफ्यू रिओ (Neiphiu Rio) यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारमध्ये सामील आहोत. तेथे आता विरोधात कोणीच नाही आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. (State Government should stop discussion and help farmers actively)

Sharad Pawar
Satyajeet Tambe News: खर्चाचा बाऊ न करता जुनी पेन्शन लागू करा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या चर्चेत असलेल्या कांदा प्रश्नासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँड सरकारमधील सहभागाची विशेष चर्चा आहे. त्याबाबत त्यांनी माहिती दिली.

Sharad Pawar
Onion News; कांद्याच्या माळा घालून शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

श्री. पवार यांनी सध्या चर्चेत असलेल्या नागालँड विषयी माहिती दिली. ते म्हणाले, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला पाठींबा दिला, अशी चर्चा पसरली आहे. त्याबाबत विचारले असताश्री पवार म्हणाले, आम्ही भाजपला पाठींबा दिलेला नाही. बऱ्याच लोकांना माहिती नसेल की, तीथे कोणताच पक्ष बाहेर रहिलेला नाही. सर्व पक्ष एकत्र आले आहेत.

Sharad Pawar
Jalgaon District Bank: नगरचा धडा घेत ‘राष्ट्रवादी’ने भाजपला दूरच ठेवले!

सर्व पक्षांनी एकत्र बसुन असा निर्णय घेतला की, नागालँड राज्यात नागा नागरिकांचे काही प्रश्न आहेत. यापूर्वी अशी स्थिती होती की नागा संघटना काही विघातक कार्यक्रम घेत होते. त्या विरोधात सर्वांनी एकत्र यावे आणि नागा संघटनांचे जे प्रकार सुरु आहेत, ते टाळावेत असे ठरले. तसा प्रयत्न तेथील मुख्यमंत्र्यांनी केला. ते भाजपचे नाही आहेत.

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी संपर्क केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सात आमदार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. राज्यातील एैक्याच्या दृष्टीने जर काही होत असेल तर त्यासाठी आम्ही सहयोग करू. आम्ही नकारात्मक किंवा डिस्ट्रक्टीव्ह धोरण स्विकारणार नाही. त्यासाठी आमचे सहकार्य असेल, यापेक्षा दुसरे काहीही नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com