Congress News; हा तर निवडणुकांसाठीचा फसवा अर्थसंकल्प!

मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट व मर्यादा वाढवण्याचा देखावा, असल्याची टिका हेमलता पाटील यांनी केली.
Dr. Hemlata Patil
Dr. Hemlata PatilSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केलेल्या अर्तसंकल्पात (Budget) सामान्य नागरिकांचा अजिबात विचार केलेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सामान्यांच्या हाती काहीच पडणार नाही. केवळ श्रीमंतांचे भले होईल, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेसच्या (Congress) प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील (Dr. Hemlata Patil) यांनी केली आहे. (Congress spoaks person criticize Centre budget for insufficient provisions)

Dr. Hemlata Patil
Chhagan Bhujbal News; अर्थसंकल्पातून फक्त आकड्यांचा धूर

केंद्र शासनाच्या आज सादर केलेल्या नवव्या अर्थसंकल्पात सरकारने सामान्यांची निराशा केली अशी स्थिती आहे. याबाबत सामान्य नागरिकांचा काहीही विचार न करता केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवल्याची टिका केली.

Dr. Hemlata Patil
Ashok Chavan On Budget : मोदी सरकार मोठमोठे आकडे सांगते, यापुर्वीच्या घोषणांचे काय ?

डॉ. पाटील म्हणाल्या, लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढवण्याचा दिखावा करण्यात आला आहे. मागील बजेटमधील डांगोरा पिटलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 80 लाख घरांचे उदिष्ट बासनात गुंडाळून ठेवले आहे.

त्या योजनेतील 21 लाख घरांच्या पुढे आम्ही गेलो नाही तर चार कोटी घरांना पाणीपुरवठा करून हर हर मोदी व घर घर पाणी सारख्या घोषणेतून केवळ एक कोटी नागरिकांनाच पाणी देऊ शकले. त्याबद्दल अर्थमंत्र्यांनी ना खंत ना खेद व्यक्त केला. पंचवीस हजार किलोमीटर रस्ते बांधणीची घोषणा देखील अशीच हवेत विरली.

देशाचा कणा असणारे कृषी क्षेत्र आणी पोषणकर्ता शेतकरी अर्थसंकल्पात वंचित रहीला पीक कर्जाच्या व्याजदरात सवलत नाही किमान आधारभूत किंमतीबद्दल चकार शब्द नाही खते बियाण्यांवरील `जीएसटी`मध्ये सवलत नाही.महाराष्ट् सरकार आपले मिंधे आहे. अशा आत्मविश्वासातुन महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातुन बाद केले. अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी, शेतकरी, नोकरदार, तरूण, महिलांसह मध्यमवर्गाचीही घोर निराशा केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com