नाशिक महापालिकेत भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्या नावाने बदल्यांचे रॅकेट?

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये रिंग झाल्याची चर्चा जोरात.
Chhagan Bhujbal & Eknath Shinde
Chhagan Bhujbal & Eknath ShindeSarkarnama

नाशिक : महापालिकेत (NMC) पदोन्नती मिळाल्यानंतर पदस्थापनेची वाट पाहणाऱ्या ३८ अभियंत्यांना मंगळवारी विविध महत्त्वाच्या पदांची लॉटरी लागली. पदस्थापना देताना ठेकेदारांप्रमाणे अभियंत्यांची रिंग झाल्याचे बोलले जाते. कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांना सोईने गुणवत्ता व नियंत्रण विभाग देण्यात आला. विशेष म्हणजे पदस्थापना करताना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा परस्पर गैरवापर झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. संबंधीत मंत्र्यांना त्याची पुसटशी कल्पनाही नसावी.

Chhagan Bhujbal & Eknath Shinde
एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावर आज येणार जनतेचा कौल!

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी २०१३ पासून प्रलंबित असलेल्या पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गात निर्माण झालेली अन्यायाची भावना दूर होण्यास मदत झाली होती. आयुक्तांचे कर्मचारी वर्गातून गुणगान होत असतानाच दोन दिवसात पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांना पदस्थापना देण्यात आली.

Chhagan Bhujbal & Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न दाखवणार `राष्ट्रवादी`च्या इच्छुकांना कात्रजचा घाट?

या पदस्थापना देताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, यात पालकमंत्री भुजबळ यांच्यासह नगरविकास मंत्री शिंदे यांच्या नावाचा वापर झाल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांनी सोईने ठरवून विभाग निवडले व त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम प्रशासन विभागाने केल्याचे बोलले जात आहे. या विरोधात सत्ताधारी भाजप तर सोडाच विरोधी पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नगरसेवकांनी गप्प बसण्याची घेतलेली भूमिका संशयाला कारणीभूत ठरत आहे. आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६५ मध्ये गोदापात्रात बांधकाम होत असल्याच्या आरोपावरून कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती मिळालेल्या संजय अग्रवाल प्रकाशझोतात आले असताना तक्रारीचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांची बदली गुणवत्ता व नियंत्रण विभागात करण्यात आल्याने त्यांची बदली सोईने करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अग्रवाल यांना काहीकाळ ब्रेक देवून नगररचना विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर पुन्हा स्थानापन्न करण्यासाठी सोय असल्याचे बोलले जात आहे.

अशा झाल्या पदस्थापना

आर. एस. पाटील यांच्याकडे पूर्वी सिडको व सातपूर विभागाचे प्रभारी कार्यभार होता, आता त्यांच्याकडे कार्यकारी अभियंतापदाची जबाबदारी देण्यात आली. पूर्व विभागात पाणीपुरवठा विभागात उपअभियंता असलेले रवींद्र धारणकर यांच्याकडे याच खात्याचा कार्यभार देताना सिडको, सातपूर व पश्चिम विभागाचा कार्यभार दिला. सिडको मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता नितीन पाटील यांची पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली. पीएमआरडीमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या उपअभियंता प्रशांत पगार यांच्याकडे उद्यान विभागाचा कार्यभार देण्यात आला. पंचवटी विभागाचे मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता गणेश मैंद यांच्याकडे पश्चिम, सिडको, सातपूर, सातपूर विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली.

महापालिकेच्या पूर्व विभागात मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता राजेंद्र शिंदे यांच्याकडे पूर्व, पंचवटी, नाशिक रोड विभागाचा कार्यभार देण्यात आला. पूर्व बांधकाम विभागाचे उपअभियंता जितेंद्र पाटोळे यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली. राजेंद्र आहेर यांना नाशिक रोड, पंचवटी विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी नियुक्त केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com