Vijaykumar Gavit News : आदिवासी समाजाने मोर्चा काढलाच कशाला?

Trible community proceed a march on thursday in Nashik-आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी आदिवासी आमदारांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.
Vijaykumar Gavit
Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

Trible Reservation News : आरक्षणाबाबत मी यापूर्वीच भूमिका मांडली आहे. धनगर समाजाला आदिवासी वर्गातून आरक्षण देताच येणार नाही, असे मी यापूर्वीच अनेकदा जाहीर केले आहे. कुठल्याही अन्य समाजाचा आदिवासी गटात समावेश होणार नाही. त्यामुळे आमदारांनी राजीनामा देण्याचा विषयच येत नसल्याचे, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज येथे सांगितले. (Trible Devolopment Minister says, there is no reason to resigned)

धनगर समाजाला आदिवासी (Trible) प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यांसह विविध मागण्यांसाठी काल नाशिक (Nashik) येथे मोर्चा काढण्यात आला होता. याविषयी डॉ. गावित (Dr. Vijaykumar Gavit) बोलत होते.

Vijaykumar Gavit
Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराज पोलिसांना सापडेनात; पोलिसांचा न्यायालयात रिपोर्ट

गुरुवारी काढलेल्या आदिवासींच्या मोर्चामध्ये सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिलेले तसेत विरोधी पक्षातील आदिवासी आमदार सहभागी झाले होते. यासंदर्भात मंत्री गावित म्हणाले, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांबरोबरच आमदार, खासदारांचादेखील धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत. संसदीय संकुल परियोजना व आदिवासी विकास महामडंळाची आढावा बैठक आज झाली. या बैठकीनंतर मंत्री डॉ. गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या अनुषंगाने विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील सर्व पक्षांचे पंचवीस आदिवासी आमदार या विषयासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यावर मंत्री डॉ. गावित यांनी स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, की कुठल्याही समाजाचा समावेश आदिवासी प्रवर्गात होणार नाही. असे करणे एवढे सोपे नाही. धनगर समाजाला आरक्षण देणे शक्यच होणार नाही. अशाप्रकारे आरक्षण देण्याची कोणतिही शिफारस आम्ही केलेली नाही. आरक्षण दिलेले नाही, त्यामुळे मोर्चा कशासाठी काढण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Vijaykumar Gavit
Dada Bhuse News : भुजबळांपाठोपाठ नाशिकचे दादा भुसेदेखील ‘ईडी’च्या रडारवर येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com