ही नोकर भरती साधी नाही...यात झालाय ३०० कोटींचा घोटाळा?

अपर आदिवासी आयुक्तांविरोधात पाच वर्षानंतर कारवाई करण्यात आली आहे.
Trible commissioner building
Trible commissioner buildingSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : आदिवासी विकास महामंडळातील (Trible Devolopment corporation) नोकर भरतीत अनियमितता केल्याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक (प्रशासन) नरेंद्र मांदळे, (Narendra Mandale) चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटीचे (पुणे) संचालक संतोष कोल्हे यांच्याविरुद्ध भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Trible commissioner building
धक्कादायक; देश शोकमग्न असताना चित्रा वाघ जल्लोषात सहभागी होत्या!

या प्रकरणात आदिवासी महामंडळातील बड्या अधिकाऱ्यांविरूद्‌ध तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल झाल्याने महामंडळासह राज्यात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत आहे. २०१५-१६ मध्ये आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील ५८४ रिक्त पदांकरीता नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये लेखी परीक्षा होऊन पुढे फेब्रुवारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु, शासनाने नेमून दिलेल्या संस्थेऐवजी खासगी संस्थेमार्फेत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे आणि कुणाल आयटी कंपनीचे संचालक संतोष कोल्हे यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या संपर्कातील उमेदवारांची वर्णी लावली होती.

Trible commissioner building
भाजप नेत्याच्या हत्येनंतर `राष्ट्रवादी`चा गुन्हेगारांना राजाश्रय!

महामंडळातील नोकर भरतीत सुमारे ३०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंघाने तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना या बोगस नोकर भरतीची चौकशी करत अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होती. श्री. डवले यांनी नोकर भरतीप्रकरणी सखोल चौकशी करत नोकरभरतीत अधिकाऱ्यांकडून अनियमितता झाली असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा अहवाल शासनास सादर करत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणात दोन मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी ही भरती प्रक्रियाच रद्द केली होती.

श्री. डवले यांच्या अहवालानुसार संबंधित आधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास मागील पाच वर्षात आजी-माजी मंत्र्यांकडूनच टाळाटाळ करत एकप्रकारे पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु होता. दुसरीकडे खासदार चव्हाण यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरुच होता.

अखेर नव्याने व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झालेले दीपक सिंगला यांनी या प्रकरणी लक्ष घालत शासनाच्या परवानगीनुसार मांदळे, लोखंडे आणि कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. महाव्यस्थापक जालिंदर आभाळे यांनी याप्रकरणी एक आठवड्यापूर्वी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी (ता. ९) गुन्हा दाखल झाला आहे.

---

महामंडळाचा कारभार हाती घेतल्यानंतर याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानुसार नोकरभरती प्रकरणातील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजीराव जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ती मिळताच त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.

-दीपक सिंगला, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com