ACB Trap News : नाशिकमध्ये लाचखोरीचे सत्र थांबेचना, लेखाधिकारी अटक

Trible devolopment`s account officer arrest by ACB-आश्रमशाळा इमारतीच्या भाड्याच्या बिलासाठी मागितली दहा हजाराची लाच.
ACB logo
ACB logoSarkarnama

Nashik ACB News : आश्रमशाळेसाठी कराराने दिलेल्या इमारतीचे भाडे अदा करण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याने येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातील लेखाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. रोज नव्या अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई होत असल्याने नागरिकांत चर्चा आहे. (ACB arrest Trible department`s account officer for bribe)

लाचलुचपत विभागाने (ACB) याबाबत आदिवासी विकास विभागाचे (Trible) लेखाधिकारी भास्कर रानोजी जेजूरकर (वय ५३) यांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शासकीय आश्रमशाळेसाठी तक्रारदाराच्या वडिलांनी अशा तीन वर्षांसाठी दोन इमारती आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्यापैकी एक इमारत क्रमांक ४२२ चे ९९ हजार ९९८ रुपये, तर दुसरी इमारत मासिक ५५ हजार रुपये भाड्याने तीन वर्षांसाठी दिली आहे.

आंबोली येथील शासकीय आश्रमशाळेसाठी भाड्याने दिलेल्या या दोन्ही इमारतींपैकी इमारत क्रमांक ४२२ (१) या इमारतीचे एप्रिल ते जून २०२३ असे तीन महिन्यांचे दोन लाख ९३ हजार ९९४ रुपये, तर इमारत क्रमांक ४२२ (२)चे एप्रिल ते जून २०२३ चे एक लाख ६५ हजार २६४ रुपये असे दोन्ही इमारतींचे मिळून चार लाख ५९ हजार २५८ रुपये थकीत भाडे मिळण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडे त्याचा पाठपुरावा सुरू होता.

ACB logo
Aditya Thackeray : ‘मला कोणालाही चोरून भेटण्याची गरज नाही’

लेखाधिकारी जेजूरकर यांनी अडवणूक करीत होता. पडताळणीच्या नावाखाली बिल प्रलंबित होते. पडताळणी करून प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी जेजूरकर याने लाचेची मागणी केली होती. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्यात आली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक सापळा अधिकारी स्वप्नील राजपूत आणि सहसापळा अधिकारी संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला असता, संशयिताला १० हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com