Covid19 impact; आजपासून आश्रमशाळा राहणार बंद!

पालकमंत्र्यांनी कोरोना आढाव्यानंतर हा निर्णय घेतला.
Covid testing
Covid testingSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : कोरोनाचा (Covid19) वाढता प्रादुर्भाव विचारात घेउन जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालय बंद आहे. मात्र आश्रमशाळा सुरुच आहे. जिल्ह्यात आश्रमशाळांमध्येच कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील आश्रमशाळा बंद ठेवल्या जाणार असल्याची माहीती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

Covid testing
जळगावच्या वादात ‘भगीरथ’ एकनाथ खडसे मोठे की ‘आरोग्यदूत’ गिरीश महाजन?

नाशिकला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर श्री भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान रविवारी एकाच दिवसात जिल्ह्यात तीन हजार कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सजग झाल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

Covid testing
सुमंत रुईकरांचा संकल्प नाशिकचे `हे` शिवसेना कार्यकर्ते पूर्ण करणार!

यासंदर्भात जिल्हाधिकारी मांढरे यांनी सोशल मिडीयावर नागरिकांनी सजग होण्याचे आवाहन केले. रविवारी ३०३५ नागरिकांचे कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आले. कोविड विषयक नियमांचे पालन केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासन कोणतिही कसर ठेवत नसताना नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आपली जबाबदारी सुद्धा पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर केले.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जि.प. परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी लिना बनसोड उपस्थित होते. श्री भुजबळ म्हणाले की, कोरोनाचा जिल्ह्यातच नव्हे तर देशभर प्रचंड गतीने प्रादुर्भाव वाढतो आहे. मास्क, सोशल डिस्टन्सींगयासह नियमावली पाळण्याचे आदेश दिले आहे. कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रशासनाला सूचना आहेत. लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याच्या सुचना दिल्या.

निधी खर्च सुरळित

केंद्राकडून मिळणारा कोरोनाचा निधी राज्यात खर्च होत नसल्याच्या तक्रारीविषयी ते म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोना असला तरी, त्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आजच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत सहभागी झाल्या होत्या. केंद्राचा कोरोनासाठीचा निधी योग्य पध्दतीने खर्च होतो आहे. पहिल्या टप्प्यात ९० टक्के निधी खर्च झाला. सुरुवातीला ४८ कोटीचा निधी आला होता. त्यातील ३९ कोटी खर्च झाला. आताही ४८ कोटीपैकी ३० कोटीच्या परवानगी दिल्या आहेत. २४ निविदा निघाल्या आहेत. १३ कोटीची औषध खरेदीसह अनेक निर्णय झाले आहेत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com