Surgana; आदिवासी पोहोचले गुजरातच्या तहसीलदारांकडे, आम्हाला गुजरातमध्ये घ्या!

सीमा संघर्ष समितीतर्फे वासदा (जि. डांग) येथील तहसीलदारांना ग्रामस्थांनी निवेदन दिले.
Chintaman Gavit at Vajda Tahsildar Office
Chintaman Gavit at Vajda Tahsildar Office Sarkarnama
Published on
Updated on

पळसण : सुरगाणा (Nashik) तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावे, वाडे, पाडे गुजरात (Gujrat) राज्यामध्ये सामील करून घ्यावे अशी मागणी सुरगाणा (Surgana) तालुका सीमा संघर्ष समितीने केली. याबाबत सोमवारी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने वासदा (जि. डांग, गुजरात) येथील तहसीलदारांना निवेदन दिले. सुविधा व विकास होत नसल्याने मागणीवर ठाम असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. (Surgana tribles are firmly Deemand merger there villages in Gujrat)

Chintaman Gavit at Vajda Tahsildar Office
Chitra Wagh; गर्दी नसल्याने चित्रा वाघ पदाधिकाऱ्यांवर संतापल्या!

सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील गाव व पाडे गेल्या अनेक वर्षांपासून अविकसित असल्याने ही सर्व गावे गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी येथील काही गावातील नागरिकांनी केल्यानंतर चिंतामण गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.

Chintaman Gavit at Vajda Tahsildar Office
Jalgaon; खडसे- महाजनांच्या चुरसीमुळे मतदारांची होतेय चंगळ

या समितीने चिंतामण गावित यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन गुजरातमधील वासदा तहसीलदारांना दिले. यामध्ये महाराष्ट्रातील सुरगाणा तहसील क्षेत्राच्या सीमावर्ती भागातील गावांना गुजरात मध्ये सामील करण्याची विनंती गुजरात सरकारला करण्यात आली आहे.

‘गुजरातमधील आदिवासींच्या विकासाच्या मानाने आम्ही खूपच मागे राहिलो आहोत. आजही आम्हाला आरोग्य सुविधा मिळत नसल्याने उपचारासाठी गुजरातमध्ये यावे लागते. महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील सीमावर्ती भागातील रस्त्यांमध्ये मोठी तफावत आहे. गुजरात मध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, सरकारी योजना इत्यादी सर्व सुविधा वेळेत उपलब्ध आहेत. मात्र आमच्याकडे तसे नाही. आम्ही सुविधांपासून वंचित आहोत. गुजरात सरकारने सीमावर्ती भागातील आदिवासी गावांना ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.त्याच सुविधा आमच्या भागात उपलब्ध करून द्याव्यात यासाठी गुजरात सरकारने आम्हाला सामील करून घ्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

संघर्ष समितीचे अध्यक्ष चिंतामण गावित यांच्यासह समितीमधील पदाधिकारी रंजित गावित, हेमंत वाघेरे, हेमराज धूम, राजेंद्र गावित, तुकाराम देशमुख, माधव पवार, मनिराम गावित, वसंत पवार, परसराम चौधरी, लक्ष्मण गायकवाड, तुळशिराम महाले, जोतिंग बागुल, उमेश पालवा, जयवंत पाडवी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुरगाणामध्ये

गुजरात राज्यात समाविष्ट करण्याच्या मागणीने पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सुरगाणाच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले, त्यानुसार सोमवारी (ता.५) जिल्हाधिकारी गंगाथरण. डी यांनी सुरगाणा तहसिल कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेत प्रलंबित कामे, अडीअडचणी समस्या आदींचा आढावा घेतला. प्रांताधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दिलिप पाटील आदी उपस्थित होते.

...

सुरगाणा गावातील गावे गुजरातमध्ये सामील करून घेण्यासंदर्भात गुजरात सरकारचे प्रतिनिधी म्हणून वासदा तहसिलदारांना निवेदन दिले आहे. आता गुजरात सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

- चिंतामण गावित, अध्यक्ष, सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com