रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीचे दोन गट भिडले; पवार तिसऱ्या गटासोबत गेले!

आमदार रोहित पवार काल जळगाव, धुळे दौऱ्यावर होते.
NCP supporter
NCP supporterSarkarnama
Published on
Updated on

धुळे : आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) काल जळगाव, धुळे दौऱ्यावर होते. धुळे शहरात त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर माजी आमदार अनिल गोटे (Ex MLA Anil Gote) यांचा फोटो नव्हता. त्यामुळे स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पवार व गोटे समर्थक प्रशांत भदाणे यांच्या समर्थकांत वाद झाला. त्यानंतर हे समर्थक आपसातच भिडले. त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. स्थिती हाताबाहेर गेली. त्यामुळे तिसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना बुलेटवर देवपूरला देवदर्शनाला नेले.

NCP supporter
आमदार रोहित पवारांनी एकाच बाणात केले अनेक पक्षी घायाळ...

कर्जत- जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा शुक्रवारी धुळे येथेे धावता दौरा होता. सायंकाळी साडेपाचनंतर त्यांचे शहरात आगमन झाले. तेव्हा पारोळा रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील वाद, झटापटीमुळे या दौऱ्याला गालबोट लागले. पक्षाचे येथील प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा स्वागताच्या बॅनरवर फोटो नव्हता. त्यामुळे गोटे समर्थक व अन्य गटाच्या कार्यकर्त्यांत वाद होऊन त्याचे रुपांतर झटापटीत झाले.आमदार पवार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद थांबेना. शेवटी दोन गट भिडत असल्याने तिसऱ्या गटाचे कार्यकर्ते आमदार पवार यांना घेऊन निघून गेले.

NCP supporter
गिरीश महाजन जळगावच्या मैदानात लढाईआधीच पराभूत झालेत का?

आमदार पवार हे जळगाव व धुळे अशा दोन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यांचे सायंकाळी साडेपाचला येथे पारोळा रोडवर आगमन झाले. त्याचे जंगी स्वागतही झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रकाश थिएटर चौकात स्वागतपर बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक प्रशांत भदाणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात वाद सुरू झाला. आमदार पवार यांच्या समोरच भदाणे व कुणाल पवार यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक झाली. नंतर या दोघाही कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली. काही कार्यकर्ते या गराड्यातून आमदार पवार यांना सुरक्षितपणे कारमध्ये बसण्याच्या प्रयत्न करीत होते. मात्र, पक्षाचा तिसरा गट आमदार पवार यांना थेट बुलेटवर घेऊन तेथून निसटला. त्यानंतरही पारोळा रोडवर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरूच होती.

आमदार पवार यांच्यासमोर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील राड्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान, चौकातील बॅनर स्वखर्चाने, वैयक्तिकपणे लावला. पक्षाच्या फादर बॉडीने तो लावलेला नव्हता, असा युक्तिवाद कुणाल पवार यांच्याकडून करण्यात आला.

तिसऱ्या गटाने पवारांना बुलेटवर नेले

पारोळा रोडवर राष्ट्रवादीच्या दोन गटात झटापट सुरु असताना तिसऱ्या गटाने ही संधी साधली. त्यांनी आमदार पवार यांना आग्रह करत थेट बुलेटवर बसविले. साक्री रोडवरील भीमनगरकडे त्यांना घेऊन गेले. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ते आमदार पवार यांना देवपूरमध्ये श्री एकवीरा देवी मंदिरात आरतीला घेऊन गेले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com