Transfer issue; ‘पीडब्लूडी’मध्ये पदाभारावरून अधिकाऱ्यांत रंगले नाट्य

कार्यकारी अभियंतापदासाठी घुगरी व पाटील दालनात ठाण मांडून बसले
Ex. Engineer R. R. Patil & Varsha Ghughari
Ex. Engineer R. R. Patil & Varsha GhughariSarkarnama
Published on
Updated on

धुळे : (Dhule) आठवड्यापूर्वी कर्मचारी, उपअभियंत्यांच्या तक्रारीसह आंदोलनानंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (PWD) प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कार्यकारी अभियंता पदावरून वर्षा घुगरी (Varsha Ghughari) आणि आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्यात रस्सीखेच सुरू झाली. सौ. घुगरी यांनी मॅटमध्ये धाव घेत बदलीस स्थगिती मिळविली. त्यामुळे त्या कार्यकारी अभियंता दालनात दाखल झाल्या. तत्पूर्वीच या पदाचा भार घेतलेले आर. आर. पाटील हेही ठाण मांडून होते. (R. R. Patil & Varsha Ghughari disputes in PWD office on Posting)

Ex. Engineer R. R. Patil & Varsha Ghughari
BJP Vice President Resign : भाजपला धक्का: प्रदेश उपाध्यक्षाने दिला राजीनामा

या दोन्ही अधिकाऱ्यांत पदभारावरून शुक्रवारी दिवसभर अधिकृत कोण, पदभार कोणी घ्यावा यावरून नाट्य रंगले. शेवटी प्रसारमाध्यमांसमोर सौ. घुगरी यांनी मिळविलेल्या स्थगिती आदेशाची प्रत स्वीकारल्यावर श्री. पाटील यांनी दालनातून पाय काढला.

Ex. Engineer R. R. Patil & Varsha Ghughari
Modi Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच ; मंत्रिपदाची माळ यांच्या गळ्यात पडणार

कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या बदलीस प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली. सौ. घुगरी यांनी स्थगिती आदेशाची प्रत बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून आलेल्या आर. आर. पाटील यांना दिली. पण, श्री. पाटील यांनी प्रथमदर्शनी प्रत घेण्यास नकार दिला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सौ. घुगरी यांनी स्थगिती आदेशाची दुसरी प्रत श्री. पाटील यांना दिली. नंतर श्री. पाटील यांनी कार्यकारी अभियंता दालनातून बाहेर पडणे पसंत केले.

नाट्याला अशी सुरवात

सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या विरोधात आठवड्यापूर्वी अनेक मुद्यांआधारे उपअभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती. विभागात सीसीटीव्ही लावणे, अरेरावी, उद्धट वर्तणूकप्रश्‍नी सौ. घुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा अन्यत्र बदली करावी. अन्यथा, सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने २८ डिसेंबरला सौ. घुगरी यांची धुळे महापालिकेत कार्यकारी अभियंतापदी बदली केली. तत्पूर्वीच, महापालिकेत कार्यकारी अभियंता पदावर बदली झालेल्या आर. आर. पाटील (संगमनेर) यांची शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागात सौ. घुगरी यांच्या जागी बदली केली होती.

घुगरी यांची मॅटकडे धाव

शासनाच्या बदली आदेशाविरोधात सौ. घुगरी यांनी मॅटकडे दाद मागितली. बांधकाम विभागाच्या सेवेत तीन वर्ष पूर्ण झालेले नाहीत. तसेच तक्रारींची सक्षम पातळीवर चौकशी झालेली नाही. त्यामुळे केवळ तक्रारींच्या आधारे मुदतपूर्व बदली करणे अन्यायकारक आहे, असे सौ. घुगरी यांच्यातर्फे मॅटमध्ये युक्तिवाद झाला. त्यात श्री. पाटील यांनीही आपले म्हणणे विचारात घ्यावे, तोपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये, अशी विनंती केली. मॅटने श्री. पाटील यांची बाजू जाणल्यावर सौ. घुगरी यांच्या बदली आदेशास स्थगिती दिली. मात्र, श्री. पाटील यांनी २९ डिसेंबरला सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्याचा पदभार घेतला. तसेच देयकांच्या धनादेशांवर माझी स्वाक्षरी असेल, असे पत्रही जिल्हा कोशागार कार्यालयास दिले.

असे असताना शुक्रवारी सकाळी दालनात प्रवेश करत सौ. घुगरी यांनी बदलीच्या स्थगिती आदेशाची प्रत श्री. पाटील यांना दिली. तरीही ते कार्यकारी अभियंता दालनात ठाण मांडून होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दाखल झाल्यावर सौ. घुगरी यांनी श्री. पाटील यांना स्थगिती आदेशाची प्रत दिली. तेव्हा नाइलाज झालेल्या श्री. पाटील यांना दालनातून काढता पाय घ्यावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागातील ही बदली आणि पदभारावरून झालेले नाट्य चर्चेचा विषय ठरत आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com