Uday Sangle vs Manikrao Kokate: दोन दिवसांपूर्वी सिन्नरला मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहराचे जनजीवन ठप्प केले. शेतकऱ्यांची दैना झाली. आता यावरून तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत. त्यामुळे पावसाने झालेल्या नुकसानीवरून आरोप होत आहेत.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उदय सांगळे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत याबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सिन्नर तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
सिन्नर येथील ‘बीओटी’ तत्त्वावर बांधलेले बस स्थानक हे कृषिमंत्री कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांनी बांधले आहे. याच इमारतीत माणिकराव कोकाटे यांचे कार्यालय देखील आहे. रविवारी झालेल्या पावसात या बस स्थानकाचे स्लॅब दोन बस वर कोसळले. यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. त्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक आहे.
याबाबत श्री सांगळे तसेच अण्णासाहेब सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, डॉ. प्रतिभा गारे, डॉ विष्णू अत्रे, बंडू नाना भाबड दत्तात्रय गोळेसर आदी त्यांनी बस स्थानकाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. स्थानकाच्या स्लॅबला कडे गेले आहेत. त्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ही दुर्घटना घडली असा आरोप केला आहे.
पावसाने बस स्थानकाचे स्लॅब कोसळले. यावेळी दोन बस उभ्या होत्या. त्यावरच स्लॅब कोसळला. सुदैवानी प्रवाशांना इजा झाली नाही. या स्लॅबला तडे गेलेले आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा व्यवस्थीत नाही, असा आरोप श्री. सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
रविवारी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले. शहरात सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाली. सिन्नर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी गेले. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे पेरणीचा प्रश्न आहे.
पिकांचे आणि काढलेला कांदा पाण्यामुळे सडला. मात्र कृषी मंत्री अद्यापही तालुक्यात फिरकलेले नाही. राज्य शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निमित्ताने कृषिमंत्री कोकाटे यांचे विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक चांगला राजकीय मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात सिन्नरचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.