Shivsena Vs BJP News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असतो. यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सहभागामुळे तो चर्चेचा विषय आहे. नाशिक शहरात मात्र या युतीचे वेगळेच अडाखे आहेत.
यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र या दसरा मेळाव्याआधीच शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसे नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्याला नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने हंड्रेड प्लस हे धोरण जाहीर केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्या दृष्टीने विरोधी पक्षांच्या नेत्यांना सामील करून घेण्यासह अनेक उपक्रम सुरू आहेत. त्यात उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांना त्यांनी टार्गेट केले होते.
भाजपच्या या आक्रमक धोरणाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील तयारीला लागला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे काँग्रेस पक्ष अक्षरशः शरण गेल्यासारखे चित्र धास्तावलेला आहे. अशा स्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र जोरदार मोहीम उघडली आहे. त्याला मनसेची ही तेवढीच मोलाची साथ आहे.
महापालिकेचा भ्रष्टाचार आणि नागरी समस्या याने शहर त्रस्त आहे. घरातील खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात आता नाशिककरांच्या जीवावर भेटले आहेत. यामध्ये खड्डे बुजविणे ऐवजी त्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. महापालिका आणि प्रशासनावर भाजपची एकमुखी सत्ता असताना शहराची दुरावस्था झाली आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, सलीम शेख, सुदाम कोंबडे यांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभर दौरे करून पक्ष बांधणी केली आहे. या बैठकांमध्ये प्रामुख्याने नाशिकचा मोर्चा आणि त्यात करायचे शक्ती प्रदर्शन यावर भर देण्यात आला होता.
नाशिक शहरात हनी ट्रॅप प्रकरण गाजले. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स विकले जात आहे. युवा पिढी बरबाद होत असताना सत्ताधारी पक्ष कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अयशस्वी झाला आहे. शहरात त्यासाठी कार्यकर्ते घरोघर जाऊन प्रचार करीत आहेत. डिजिटल माध्यमांवर प्रचार आहे. महापालिका हे सत्ताधारी भाजप साठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. नागरिकांचा छळ या माध्यमातून होत असल्याने सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी शुक्रवारी शहरात शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे मोठे शक्ती प्रदर्शन करील असा दावा महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी केला.
या मोर्चासाठी शिवसेना आणि मनसे कंबर कसून कामाला लागली आहे. पालिका निवडणूक हे त्यांचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्या आधीच नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसे मोठे शक्ती प्रदर्शन करून आपल्या ठसा उमटवण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे. नाशिकच्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला त्याची उत्सुकता आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.