Uddhav Thackeray Jalgaon News : गौतम अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मी घरीबसून काम केले हो केले, पण मी घरी बसून जे काम केले ते तुम्हाला वनवन भटकून सुद्दा करता येत नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला.
वैशाली ताई लढण्यासाठी माझ्याकडे आल्या आहेत. पाचौऱ्यामध्ये गद्दारांना गाडणार आहात की नाही? सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबीत आहे. न्यायदेवता न्याय देईल. मात्र, तुम्ही वैशालीताईंच्या पाठिशी उभे रहा, मी कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ दिली नाही. हे कोरोनामध्ये ढोल वाजवा, थाळ्या वाजवत बसले होते. आणि सांगत होते, की मंदिर उघडा, पण मी ते होऊ दिले नाही. आमचे पाशवी हिंदुत्व नाही, सावरकर म्हणाले होते गाय माता असेल तर ती बैलाची आहे माणसाची नाही, असेही ठाकरे म्हणाले.
रोशनी शिंदे यांची तक्रार अजूनही घेतली नाही. मात्र, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? माजी राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले त्या प्रमाणे, सैनिक यांनी निवडणुकीसाठी मारले असतील तर? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. पाचोरा जिवंत आहे, ज्यांना स्व:ताचे काहीच नसते, त्यांना दुसऱ्याचे चोरावे लागते. मुंबईत जे घडले ते किती विकृत आहे, त्यामध्ये उष्माघाताने १५ लोक गेले. काय केले त्यांनी तिकडे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपला आणि शिंदेंना आव्हान आहे की तुम्ही आमचे चोरलेले धणुष्यबान घेऊन या, आणि नरेंद्र मोदींचा चेहराही घेऊन या मी माझे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे घेऊन येतो, बघू महाराष्ट्र कोणाच्या पाठिशी उभा राहतो. महाराष्ट्र हा विरांचा आहे, गद्दारांचा होऊ शकत नाही, मी वाट बघत होतो, घुसणारे कधी घुसणार आहेत, पण ते घुसले नाहीत. संजय राऊत जे बोलले होते, की घुसणारे परत जाणार नाहीत. आम्ही अजूनही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही नामर्द नाहीत, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.