Nashik Politics: ठाकरे गटातील करंजकर नवा डाव टाकणार ; उमेदवारी नाकारल्याने कोणाला नडणार?

Nashik constituency 2024: १४ वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम केलेल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यावर अन्याय झाला आहे. या अन्यायांचे परिमार्जन करण्यासाठी आपण या विरोधकांना उघडे पाडू.
vijay Karanjkar
vijay KaranjkarSarkarnama

Shiv Sena news: नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे गेले महिनाभर करंजकर प्रचारापासून अलिप्त होते. आता त्यांनी थेट बंडखोरीची घोषणा केली आहे.

नाशिक मतदार संघात महाविकास आघाडीचे माजी आमदार वाजे यांच्या सुरळीत सुरू असलेल्या प्रचारात मोठा अडथळा आणण्याची योजना पक्षातील विरोधकांनीच केली आहे. या संदर्भात पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या विजय करंजकर यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी येत्या दोन दिवसात पुढील निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. करंजकर हे अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याची शक्यता आहे.

गेले महिनाभर ठाकरे विरोधकांशी सलगी वाढवत करंजकर यांची चाचपणी सुरू होती. करंजकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाकडे उमेदवारी देखील मागितली होती. मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात देखील होते.

या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचे तयारी सुरू होती. मात्र महायुतीतील जागावाटपाची ओढाताण आणि उमेदवारीच्या स्पर्धेत करंजकर यांचा टिकाव लागला नाही. आता महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला आहे. पार्श्वभूमीवर विजय करंजकर नवा डाव टाकण्याची तयारी करीत आहे.

करंजकर यांनी काल आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. यावेळी आपल्याला उमेदवारी नाकारून पक्षाने अन्याय केला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला एकटे पाडले. करंजकर यांच्याशी नेत्यांनी चर्चा करू नये, अशी व्यवस्था केली. यातून १४ वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम केलेल्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यावर अन्याय झाला आहे. या अन्यायांचे परिमार्जन करण्यासाठी आपण या विरोधकांना उघडे पाडू. येत्या दोन दिवसात निर्णय घेणार, असे करंजकर म्हणाले. त्यामुळे लढणार की नडणार हे लवकरच समजेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

vijay Karanjkar
Nashik Constituency 2024 : महायुतीची डोकेदुखी; अजित पवार गटाचे निवृत्ती अरींगळे बंडाच्या तयारीत

करंजकर भगूर शहराचे माजी नगराध्यक्ष आहेत. या नगरपालिकेत त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्व नगरसेवक विजयी झाले आहे. काल झालेल्या मेळाव्यात भगूर आणि परिसरातील कार्यकर्ते तसेच शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याचे स्वरूप शक्ती प्रदर्शन असेच होते. त्यामुळे करंजकर आता ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेला ते किती डॅमेज करतात याची उत्सुकता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com