

Uddhav Thackeray Shirdi Rally : आधी विमानाने एकत्र प्रवास, मग देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरु, फडणवीस यांच्या खुर्चीचे रक्षण कर... मागील 2 दिवसांत 3 वेगवेगळी वक्तव्य करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मैत्रीचा हात दिल्याची चर्चा आहे.
फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करत उद्धव ठाकरे आज (29 जून) शिर्डी येथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात होते. शिर्डी येथे ‘निष्ठेची वज्रमूठ’ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "देशावर आलेले भाजपरूपी भ्रष्ट राजवटीचे संकट दूर कर, यांचा कारभार गाडून टाक आणि महाराष्ट्र वाचव, अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर", अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केली असल्याचं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंनी पक्षातून बंड केलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2029 नंतरच्या नेतृत्वाच्या शर्यतीत पुढे जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचा पत्ता आत्ताच कट करण्यासाठी पडद्यामागून खेळी सुरू आहे. याचसाठी शाहसेनेला सुपारी देण्यात आली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
अमित शाह यांच्यावर आरोप करत ठाकरे म्हणाले, “राज्यातील फोडाफोडीमागे आणि आमचे खासदार तोडण्यामागे पडद्यामागे अमित शाह यांचाच हात आहे. आज राज्यात भाजपपेक्षा शाहसेनेचे खासदार जास्त झाले आहेत.” 400 पारचा नारा देऊन संविधान बदलण्याचा डाव होता. पण महाराष्ट्राने त्यांचे स्वप्न चक्काचूर केले. आता महिला आरक्षण आणि परिसीमनच्या माध्यमातून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ठाकरे यांनी ठासून सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात आहे, असे म्हटलं होते. त्याल फडणवीस यांनी मला पंख नाहीत, मी पक्षी नाही, असं म्हटलं होते. यावर ठाकरेंनी, पण हा वाक्प्रचार आहे, हे समजण्यासाठी मराठी यावी लागते. पंख कापायचे म्हटल्यावर ते म्हणतात मग काय कापायचं ते सांगा, या टोमणा सभेत मारताच एकच हशा पिकला.
यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांनाही लक्ष्य केले. ज्याला मराठी नीट बोलता येत नाही, तो माझ्या पक्षाचा निर्णय देणार, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. दिल्लीसमोर जी हुजूर करत नतमस्तक व्हावं लागतं, अशी अवस्था राज्य नेतृत्वाची झाली आहे, असा घणाघात करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. शिर्डीतील या सभेनंतर राज्यात आगामी राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेले हे वक्तव्य आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडणारे ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.