Shiv Sena Warning: आक्रमक शिवसेनेचे सरकारला इशारा; जन सुरक्षा हा कामगारांना वेठबिगार करणारा कायदा!

Aggressive Shiv Sena Protests 'Jan Suraksha' Bill Over Forced Labor Concerns: शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्य सरकारला दिला इशारा
Uddhav Thackrey & Devendra Fadanvis
Uddhav Thackrey & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Government Protest: कामगारांचे कामाचे तास आठ वरून बारा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे जन सुरक्षा विधेयक नुकतेच मंजूर झाले. त्या विरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात नाशिक शहरात बुधवार हा सरकार विरोधात आंदोलनाचा दिवस ठरला.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे नाशिक शहरात आक्रमक निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या विधेयकाच्या विरोधात आंदोलन केले. जिल्हाभरात बुधवारी ठीक ठिकाणी आंदोलन झाल्याने विरोध वाढत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शहर कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील महायुती सरकार सामान्य जनता आणि कामगारांचे शोषण करण्याचे काम करीत आहे. त्या विरोधात सामान्य जनता संतप्त असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Uddhav Thackrey & Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal Politics: मराठा आरक्षण; छगन भुजबळांची एकीकडे सरकारवर नाराजी, दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांची स्तुती!

कामगारांना सुविधा देण्याऐवजी त्यांची विविध कायदे करून कोंडी करण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. राज्यातील महायुती सरकारने कामाचे तास आठ ऐवजी 12 असे वाढविले आहे. हे कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अक्षरशा शोषण करण्याची परवानगी देण्याचे काम सरकारने केले असा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी हा निर्णय रद्द होईपर्यंत शिवसेना संघर्ष करील असा इशारा दिला. राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. युवकांपुढे भवितव्याची चिंता आहे. अशा स्थितीत राज्यातील महायुती सरकारकडून कामगारांना वेठबिकार करण्याचे काम होत आहे.

कामाचे त्यास वाढविल्यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल. तीन कामगारांचे काम दोन कामगारांमध्ये होणार आहे. त्याचा पुरेपूर फायदा उद्योग घेतील. त्याचा गंभीर परिणाम म्हणजे, समाजात असंतोष आणि अशांतता निर्माण होण्यात‌ होईल, त्यामुळे सरकारने हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख प्रथमेश गीते महेश बडवे यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com