Uddhav Thackrey Politics: शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची नवी रणनीती, आता थेट...

Uddhav Thackrey; Will Uddhav Thackeray's new strategy to stop the leaks in Shiv Sena be successful?-सभा, मेळावे यावर भर देणारे उद्धव ठाकरे यांचा आता थेट कार्यकर्त्यांशी संवाद.
Uddhav Thackrey.
Uddhav Thackrey.Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thakrey news: विविध राजकीय उपाय आणि प्रयत्न करूनही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी चिंतेत आहेत. पर आता एक नवा उपाय शोधण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरीष्ठ नेते सक्रीय झाले आहेत.

नाशिक शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दाखल झाले आहेत. गळती रोखणे हा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे गंभीर पेच आहे. त्यासाठी थेट शाखा स्तरावर बैठका आणि संवाद मिळावे घेऊ नये त्याचा फार उपयोग झालेला नाही.

यासंदर्भात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी रणनीती आखली आहे. येत्या दोन आठवड्यात उद्धव ठाकरे राज्याच्या प्रमुख महानगरांचा दौरा करणार आहे. आठवड्यात नाशिक शहराचा दौरा अपेक्षित असून या दौऱ्यात ते थेट कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहे.

Uddhav Thackrey.
Nashik Women's atrocity: महिलांचा लैंगिक छळ करणारा मिनी मंत्रालयातील 'तो' अधिकारी सक्तीच्या रजेवर!

पक्षाच्या नव्या रणनीतीनुसार सभा आणि मेळावे यावर भर न देता थेट संवाद केला जाईल. विधानसभा मतदारसंघ निहाय शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचे यादी तयार करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यक्तिशः संवाद साधतील. पक्षात होणारी गळती आणि संघटनात्मक आव्हाने यावर उपाय योजना करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. येत्या चार ते पाच महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षापुढे महापालिकांच्या निवडणुकीत आपले संख्याबळ टिकविणे हे मोठे आव्हान आहे.

शिवसेना ठाकरे पक्षातील नाशिकच्या ३५ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे. त्या मागची कारणे आणि उपाय यावर सध्या पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षणातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत कार्यकर्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात बुधवारी शिवसेना कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेना ठाकरे पक्षापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांचे मोठे आव्हान असेल. सत्तेबरोबरच विविध शासकीय यंत्रणांचा उपयोग महायुती सरकार आपल्या राजकीय उपक्रमांसाठी करते असा आरोप यापूर्वीच झाला आहे. नाशिक मध्ये पोलीस यंत्रणेवर ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे व त्या माध्यमातून पक्षांतराला भाग पाडण्यात आल्याचे आरोप यापूर्वीच करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची नवी रणनीती कितपत उपयोगी पडते, याची उत्सुकता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com