Taloda APMC: आमदार राजेश पाडवी यांनी बाजार समिती बिनविरोध केली

बाजार समिती बिनविरोध निवडणुकीची परंपरा नेत्यांच्या सामंजस्याने कायम
MLA Rajesh Padavi
MLA Rajesh PadaviSarkarnama
Published on
Updated on

Taloda APMC news : तळोदा बाजार समिती निवडणुकीत आमदार राजेश पाडवी यांनी दाखवलेल्या बेरजेचा राजकारणामुळे बाजार समिती बिनविरोध होण्यास मदत झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यात आमदार राजेश पाडवी यांनी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बाजार समिती बिनविरोध करून दाखवली आहे. (MLA Rajesh Padavi take initiative for Unoppose election of Taloda APMC)

आमदार राजेश पाडवी स्वतः सभापतीपदी राहतील की अन्य कोणाला संधी देतील याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे सहकार्य लाभले आहे.

MLA Rajesh Padavi
Ajit Pawar News : मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली, तर बिघडले कुठे?

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे हित लक्षात घेऊन सर्वपक्षीय संचालक निवडले जाण्याची परंपरा यंदा देखील कायम राहिली आहे. त्यात तालुक्यात गटप्रमुख म्हणून निवडणूक लढवून स्वतः व आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची क्षमता मोजक्याच नेत्यांकडे होती.

त्या नेत्यांमध्ये तालुक्यात माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी यांना गटप्रमुख म्हणून पाहिले जाते. त्यांनी नगरपालिका असो अथवा सहकारी संस्था तेथे आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवून जिंकल्या देखील आहेत. मात्र तालुक्याचा राजकारणात कधीही कमालीची कटुता येऊ दिलेली नाही. त्यामुळे निवडणूक संपली की सर्वांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळेच बाजार समितीत देखील मागील अनेक वर्षांपासून बिनविरोधाची परंपरा टिकली होती असे बोलले जाते.

MLA Rajesh Padavi
Shivsena news : गुलाबराव काहीही म्हणोत, शिंदे गटाने घेतलाय उद्धव ठाकरेंचा धसका!

सर्वपक्षीय नेत्यांशी समन्वय

आमदार राजेश पाडवी यांनीही तोच सलोख्याचा व मैत्रीचा कित्ता गिरवत सर्व पक्षाच्या नेत्यांशी समन्वय साधून बाजार समिती बिनविरोध केली आहे. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वात बाजार समितीची पुढील वाटचाल राहणार आहे. आता ते स्वतः देखील बाजार समितीत संचालक आहेत. त्यामुळे ते सभापती पदी विराजमान होतील काय याचीच उत्सुकता आहे की इतर कोणाला ते संधी देतील यावर तालुक्यात चर्चा सुरू आहेत.

MLA Rajesh Padavi
Chhagan Bhujbal News : मुंबईतील उद्योग, कार्यालये पळविले जात आहेत!

बाजार समितीचे साधले हित

बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी आमदार राजेश पाडवी , आमदार आमश्या पाडवी, माजीमंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, डॉ. शशिकांत वाणी, योगेश चौधरी, जितेंद्र दुबे, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश मराठे, अनुप उदासी, गौतम जैन या सर्वांचे सलोख्याचे संबंध कामी आले आहेत. त्यात बेरजेचे राजकारण असल्याने त्यातच बाजार समितीचेही हित साधले गेले असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com