
Honey trap News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी 'हनी ट्रॅप' प्रकरण घडलेच नाही, असे विधान करून या प्रकरणातील हवा काढून घेतली. मात्र काँग्रेस नेते हा विषय सहजासहजी सोडायला तयार नाही. उलट या प्रकरणाचा गुंता अधिक वाढतो की काय अशी चर्चा आहे.
हनी ट्रॅप प्रकरणाबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे दुसरे नेते विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना साथ दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी आक्रमकपणे या विषयावरून राज्य शासनावर हल्ला केला.
काँग्रेस नेत्यांच्या आरोपामुळे हनी ट्रॅप प्रकरणाचे जाळे विरोधी पक्ष सहजासहजी सैल होऊ देणार नाही असे दिसते. या प्रकरणावरून नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याविषयी प्रशासनातील अनेक उच्चस्पदस्थ संबंधितांकडे कानोसा घेत असल्याचे बोलले जाते.
दरम्यान हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यावर या संदर्भात तक्रार केलेल्या सर्व तक्रारदारांवर दबाव आहे. यातूनच संबंधितांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्या आहेत. अन्य कोणत्याही तक्रारी येऊ नयेत यासाठी या प्रकरणात अडकलेल्यांचा प्रयत्न लपून राहिलेला नाही.
दरम्यान याबाबत सत्ताधारी पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची संबंध असलेल्या नेत्यांची माहिती जवळपास सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी संबंधितांकडे चाचणी करून यात अडकलेल्यांची नावे काढण्याचा प्रयत्न केला आहे.
पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाल्यावर हनी ट्रॅप प्रकरण पडद्यामागे जाईल असे वाटत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी यावर गंभीर विधान केले. या प्रकरणातील बहुतांशी पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या हाती लागलेला महत्त्वाचा मुद्दा ते सहजासहजी सोडतील अशी स्थिती नाही. असा स्पष्ट संदेश वडेट्टीवार यांच्या वक्तव्यातून मिळाला आहे.
हनी ट्रॅप चे केंद्र असलेल्या नाशिक मध्ये या संदर्भात प्रामुख्याने यापूर्वी काम केलेल्या उच्चपदस्थ महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांची नावे असल्याने खळबळ उडाली आहे. समाज माध्यमांतून याबाबत रोज नव्या चर्चा घडविल्या जात आहेत. याबाबत केंद्रस्थानी असलेल्या रिसॉर्टवर तपासणी झाल्याची अफवा काल पसरली होती. त्यामुळे अनेकांनी त्याची खातरजमा करण्यासाठी धावपळ केली. मात्र हाती काहीच लागले नाही.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.