काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडियाची कार्यकारीणी घोषीत झाली.
Vishal Muttemvar & Dnyaneshwar Chawan
Vishal Muttemvar & Dnyaneshwar ChawanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : विशाल मुत्तेमवार (Vishal Muttemvar) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत राज्य समन्वयकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक विभागात ज्ञानेश्वर चव्हाण (Dnyaneshwar Chavan) यांची निवड झाली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी तसेच अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या झाल्या आहेत.

Vishal Muttemvar & Dnyaneshwar Chawan
आगामी महापालिका निवडणुक भाजप विकासाच्या मुद्दयावरच लढणार!

विशाल मुत्तेमवार यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री तथा विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Vishal Muttemvar & Dnyaneshwar Chawan
धुळे बँकेत पहिल्यांदाच शिवसेनेच्या गटाच्या चार संचालकांची एंट्री!

सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष, नेत्याबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे. या बदनामीच्या मोहिमेला चोख उत्तर देण्याबरोबरच वास्तव माहिती, भारतीय राज्यघटना, देशाची एैतिहासिक परंपरा, उज्ज्वल इतिहास, पक्षाची ध्येयधोरणे, काँग्रेसचा विचार तळागळापर्यंत पोहवण्यासाठी श्री. मुत्तेमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम उत्तम काम करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मीडिया टीमच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये राज्य समन्वयक म्हणून विनय खामकर, डॉ. धनंजय क्षिरसागर, बिलाल अहमद, विजयानंद पोळ, श्लोकानंद डांगे, ज्ञानेश्वर चव्हाण, सुमित लोणारे, चैतन्य पुरंदरे, केतन गावडे, मनोज सिंग, अब्दुल सय्यद, डॉ. प्रवीण सरपाते, स्नेहा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com