Vivek Kolhe : '3000 कोटींचा हिशोब द्या'; विवेक कोल्हेंचं चॅलेंज अजितदादांचा आमदार स्वीकारणार का?

Vivek Kolhe MLA Ashutosh Kale challenge for accounting of development works in Kopargaon : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिलेले चॅलेंज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे स्वीकारणार का?
Vivek Kolhe
Vivek KolheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणूक, जशी जवळ येत आहे, तशी युवा नेते देखील आक्रमक होताना दिसत आहेत. कोपरगावमधील युवा नेते विवेक कोल्हे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेत.

"कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट सिटी घालून 20 ते 25 हजार युवकांचा रोजगार बुडवल्याचे महापाप आमदारांनी केले. 3000 कोटींच्या विकासकामांचा हिशोब चौकात येऊन द्या. त्यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे", असं चॅलेंज विवेक कोल्हे यांनी आमदार काळेंना केलं.

विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. कोपरगाव तालुक्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवरून देखील पुन्हा एकदा आमदार काळेंना सुनावले. आम्ही युवकांना रोजगार मिळावा, यासाठी मेळावा घेतला. परंतु त्यांनी फक्त दोन नंबरवाल्यांचे धंदे वाढवले, असा गंभीर आरोप विवेक कोल्हे यांनी आमदार काळेंवर केला. आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर आहे. विवेक कोल्हेंनी 3000 कोटींच्या विकासकामांच्या हिशोबाचा चॅलेंज दिले असून, अजितदादांचा हा शिलेदार त्याला समोरे जाणार का? अशी चर्चा कोपरगावमध्ये रंगली आहे.

Vivek Kolhe
Ahmednagar Politics : अजितदादांना नगरमधून मोठा धक्का; पवारसाहेबांच्या 'शिवस्वराज्य'ची एन्ट्री अन् मोठ्या नेत्यानं पद सोडलं

विवेक कोल्हे म्हणाले, "आमदार आशुतोष काळे यांनी स्मार्ट सिटी घालवली, युवकांच्या हक्काचा रोजगार बुडवला. कोपरगाव तालुक्यातील विकासाचा वेग गुन्हेगारीमुळे मंदावला आहे आणि या गुन्हेगारीला कोणाचे पाठबळ आहे, हे सर्वश्रुत आहे. आमच्यावर टीका केल्याशिवाय आमदार काळे यांना मतं मिळणार नाहीत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने आमच्यावर टीका करण्याची ते संधी शोधतात". हक्काच्या पाणी विरोधात, समन्यायी पाणी वाटप कायदा होताना हे गप्प बसले होते. आता त्यांनी कितीही तळे बांधले तरी त्याचा फायदा होणार नसल्याचा टोला विवेक कोल्हे यांनी लगावला.

Vivek Kolhe
Jayant Patil : आमदार जगतापांना विखेंसारख्या पराभवाची भीती; जयंत पाटील म्हणाले, 'सत्तेत येताच, त्यांना नवा विषय...'

आमदार काळे चॅलेंज स्वीकारणार का?

'कोपरगाव तालुक्यातील पाच नंबर तलावाची खोली आणि रुंदी मोजायची मागणी नागरिकांमधून झाली होती. मात्र आमदार काळेंनी घाईघाईने जलपूजन केले. त्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून नगरपालिका हद्दीत झालेल्या कामाचे ऑडिट झाले पाहिजे. कारण काळे यांचे 3000 कोटींचा विकास फक्त 'फ्लेक्स' वर दिसतो. जमिनीवर काहीच दिसत नाही. त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी आंबेडकर चौकात येऊन 3000 कोटींच्या कामावर चर्चा करावी', असे आव्हान विवेक कोल्हे यांनी दिले.

कोल्हेंचा आमदार काळेंना सल्ला

"विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणावरून गंभीर मुद्दे उपस्थित केले. नजीम शेख यांनी केलेला गोळीबार हा गंभीर मुद्दा आहे कारण नजीम शेख हा कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे, हे अख्या कोपरगावला माहित आहे. ज्याला गोळी घातली आहे, तो सुद्धा कोणाचे नाव घेत आहे, हे एकदा तपासून पाहा आणि त्यानंतर अब्रूनुकसानीचे दावे दाखल करण्याचा इशारा द्या", असा सल्ला विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com