Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

जिल्हा परिषद गट राखीव झाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींना आरक्षणाचा फटका.
Amruta Pawar
Amruta PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेच्या (Zillha Parishad) आरक्षण सोडतीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह अनेक माजी सदस्यांचे गट राखीव झाले. यामध्ये सर्वाधीक मताधिक्याने निवडूण आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता पवार (Amruta Pawar) यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी हुकली. त्यामुळे जिल्ह्याचे नवे नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत यंदा बहुतांश नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. (Prominent ZP leaders not able to face election, since there gat being reserved)

Amruta Pawar
Nashik News; `सारथी`ला नाशिकमध्ये शासनाकडून दीड एकर जमीन

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी अध्यक्ष शीतल सांगळे, जयश्री पवार, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, सभापती नयना गावित, अश्‍विनी आहेर, अपर्णा खोसकर तसेच संजय बनकर, किरण थोरे, उदय जाधव, डॉ. कलावती चव्हाण यांच्यासह भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ वनारसे, महेंद्रकुमार काले, शंकरराव धनवटे यांचे गट राखीव झाले. त्यामुळे या नेत्यांचा हिरमोड झाला.

Amruta Pawar
Shivsena; शिवसेनेचा नाशिक महापालिकेसाठी ‘हंड्रेड प्लस’चा नारा!

मावळत्या सभागृहातील ७३ सदस्यांपैकी नितीन पवार, हिरामण खोसकर हे विधीमंडळाच्या सभागृहात पोचले आहेत. मात्र उर्वरित माजी सदस्यांपैकी ५३ सदस्यांना गट राहिलेला नाही. जवळपास १७ माजी सदस्य हे गट बदलून अथवा आरक्षणाऐवजी सर्वसाधारण जागेवरून पुन्हा निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजी सभापती सुरेखा दराडे, मंदाकिनी बनकर, रुपांजली माळेकर, सुशीला मेंगाळ, नयना गावित, वैशाली खुळे, सीमंतिनी कोकाटे, गणेश अहिरे, यतींद्र पगार, साधना गवळी, बलवीर कौर निर्मल गिल, मनिषा पवार, यशवंत गवळी, ज्योती जाधव, भास्कर गावित, हेमलता गावित, अशोक टोंगारे, सुनीता चारोस्कर यांचा समावेश असू शकेल. त्याचवेळी माजी सदस्यांसह पदाधिकाऱ्यांप्रमाणे राजकीय घराण्यांमधील पुढील पिढीमध्ये निवडणूक लढविण्याची आशा बळावली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकूळ, खासदार हेमंत गोडसे यांच्या स्नुषा भक्ती गोडसे, माजी आमदार धनराज महाले यांचा मुलगा वैभव, आमदार नितीन पवार यांचा मुलगा ऋषीकेश, माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर, माजी आमदार शिवराम झोले यांच्या स्नुषा हे निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांचा मुलगा हर्षवर्धन यांना ‘लॉचींग' केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता त्यांना त्यांच्या जायखेडा गटातून उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी सभापती पोपट अहिरे, अशोक सावंत, उषा बच्छाव, माजी सदस्य मनिषा भामरे, मनिषा बोडके, विलास आलबाड, दत्तू ढगे यांच्या पत्नी, दत्तात्रय पाटील, सुरेश ढोकळे, प्रवीण जाधव, ज्योती माळी, संभाजी पवार, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब वाघ आदींकडून निवडणुकीची तयारी होण्याची शक्यता अधिक आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड हे उमेदवारीसाठी सिन्नरमधून आग्रही राहू शकतात, परंतु भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासाठी देवळ्यातून गट राहिलेला नाही. त्याचवेळी माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली यांच्याकडून कळवणऐवजी बागलाण अथवा देवळ्याचा विचार होऊ शकेल. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यासाठी देवळ्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह होऊ शकतो.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com