Chitra Wagh; थोडे थांबा, कोणीही महाराष्ट्र सोडून जाण्याचे म्हणणार नाही!

भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केला विश्‍वास
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

नंदुरबार : राज्यातील (Maharashtra) सीमावर्ती (Border villages) गावे शेजारच्या राज्यात जाण्याच्या मागण्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Government) थोडा वेळ द्या, मग बघा महाराष्ट्राचा कसा विकास होतो. त्यानंतर कोणीही महाराष्ट्र सोडून परराज्यात समाविष्ट करा असे म्हणणार नाहीत. (Maharashtra will progress under leadership shinde Fadanvis Government)

Chitra Wagh
Chitra Wagh; गर्दी नसल्याने चित्रा वाघ पदाधिकाऱ्यांवर संतापल्या!

सध्या सुरू असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील गावांच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील काही गावांनीही सुविधा मिळत नसल्याने महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे.

Chitra Wagh
Jalgaon; खडसे- महाजनांच्या चुरसीमुळे मतदारांची होतेय चंगळ

त्याबाबत प्रश्‍नावर बोलताना श्रीमती वाघ म्हणाल्या, की महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत. अनेक गावांपर्यंत विकास पोचला नसेल, मात्र शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन आताशी शंभर-सव्वाशे दिवस झाले आहेत. त्यांनी चांगले निर्णय घेण्याचे धडाके लावले आहेत. ते प्रत्यक्ष विकासाला महत्त्व देत आहेत. जनतेला आवश्‍यक सोयी-सुविधा पुरविण्यावर त्यांचा भर आहे. या शासनाला जरा थोडा वेळ द्या, मग बघा महाराष्ट्राचा कसा विकास होतो. महाराष्ट्र बदलेल, गावांचा विकास होईल, जनतेला सुविधाही मिळतील.

त्या म्हणाल्या, आज जरी सामावर्ती भागातील काही गावांतील नागरिक समस्यांना कंटाळून लगतच्या राज्यात समाविष्ट होण्याची मागणी करीत असतील, तरी थोडे थांबा, मग कोणीही महाराष्‍ट्र सोडून जाण्याचे म्हणणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

टाचणीभर जागाही कर्नाटकला देणार नाही

सध्या सुरू असलेल्या सीमावादात सत्तेतील शासनातील नेत्यांनी शेपूट गुंडाळले असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले असल्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता, श्रीमती वाघ म्हणाल्या, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे, कर्नाटकला टाचणीभरही जागा देणार नाही. त्यामुळे त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेईल. त्याबाबत राऊत साहेबांनी चिंता करण्याची गरज नाही, असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com