‘मोदींनी मला सांगितलं होतं, गुलाब, महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज’

मागच्या काळात काम करताना पक्ष पाहिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करायचं होतं. त्यानुसार केंद्र सरकारची ‘हर घर जल; हर घर नल’ ही योजना राबविली.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : मागच्या काळात काम करताना पक्ष पाहिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं स्वप्न साकार करायचं होतं. त्यानुसार केंद्र सरकारची ‘हर घर जल; हर घर नल’ ही योजना राबविली. त्यावेळी मोदीसाहेबांनी मला सांगितलं होतं की, ‘गुलाब, महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज.’ त्या पद्धतीनेच मी गेल्या सरकारमध्ये काम करत होतो, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. (Water Supply Minister Gulabrao Patil praised Narendra Modi)

जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. गुलाबराव पाटील व भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे अनेक दिवसानंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते.

Gulabrao Patil
केजरीवाल सरकारची अग्निपरीक्षा; विधानसभेत मांडणार विश्वासदर्शक ठराव

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, काँग्रेसचं काही ऐकू नका आणि भाजपचं सोडून द्या, असे मला कोणी सांगितलं नव्हतं. मोदीसाहेबांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की गुलाब, महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज. मी तेच काम करतोय, त्यामुळे माझ्यावर टीकासुद्धा झाली. पण टीका करून काय उपयोग. आमदारपद हे जनतेने निवडून दिलेले आहे. पक्षीय मतभेद असतात. पण लोकांनी ज्यांना सर्वमान्य केले आहे, त्याला आपणही मान्य केले पाहिजे.

Gulabrao Patil
Nitin Gadkari : विहिरीत उडी घेईल, पण..; वापरा अन् फेका ही पॉलिसी चांगली नाही, गडकरी संतापले

आमचं ७५ टक्के आयुष्य विरोधात गेलेले आहे. विरोधात असताना काय त्रास होतो, हे आम्ही भोगलेलं आहे. त्यामुळे राजकारणात आपल्याला मुंजोबा, पिरोबा सारखी भूमिका निभावी लागणार आहे. देवाच्या घरी जसं लोकं जातात, तसं आपल्या घरी लोकं येत असतात. त्यामुळे आपल्यासारखे भाग्यशाली कोणी नाही. आपण लोकशाहीतले देव आहोत. त्यामुळे आपल्या दरवाजात येणाऱ्या माणसाचं दुःख दूर करण्याचे काम परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला.

Gulabrao Patil
पंतप्रधान मोदींनी येडियुरप्पांची ती मागणी केली मान्य!

पाटील म्हणाले, पक्षबिक्ष मी काही बघत नाही. आलं कामं की करून टाकतो. मत देगा उसा की भी भला आणि न देगा उसकी भी भला, अशा पद्धतीने आपण काम केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळात हेच गुलाबराव पाटील नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करायचे. आता भूमिका बदलल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com