Rahuri News: राहुरीत पाणीबाणी; भाजप अन् माजी खासदारांनी ठेकेदाराला घेरलं

Rahuri BJP Workers: राहुरी शहराचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळीत आहे. नवीन पाइपलाइनच्या कामामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी भाजप शहरातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना घेराव घालत जाब विचारला.
Rahuri News
Rahuri NewsSarkarnama
Published on
Updated on

Rahuri News: राहुरी शहराचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळीत आहे. नवीन पाइपलाइनच्या कामामुळे दिवसाआड पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी होत आहे. राहुरी शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरेंना घेराव घातला, तर माजी खासदार प्रसाद तनपुरे (Prasad Tanpure) यांनी नगरपालिका कार्यालयात जात पाइपलाइनचे काम करणाऱ्या ठेकेदाराची कानउघाडणी केली. दोन दिवसांत पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे आस्वासन ठेकेदाराने या वेळी दिले.

राहुरी शहराचा (Rahuri) पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून विस्कळीत आहे. नवीन पाइपलाइनच्या कामामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी भाजप (BJP) शहरातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना घेराव घालत जाब विचारला. भाजपचे शहराध्यक्ष भय्या शेळके, प्रकाश पारख यांच्या नेतृत्वाखाली गेलेले शिष्टमंडळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात चांगलेच आक्रमक झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुरी नगरपालिकेच्या (Rahuri Municipality) मुळानगर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नवीन काम चालू असल्याने राहुरी शहराला एक महिन्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. प्रत्यक्षात काम पंधरा दिवसांत पूर्ण होईल. पण महिनाभर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने सुरळीत व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राहुरी शहरातील पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची भेट घेतली.

मुख्याधिकारी यांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या वेळी शिवाजी डौले ,गणेश खैरे, सुरेश भुजाडी, सचिन मेहत्रे,राजेंद्र मुंडे बाबासाहेब शिंदे , आबासाहेब येवले, मधुकर पोपळघट उपस्थित होते. पाणीपुरवठ्याचे काम पंधरा दिवसांत पूर्ण होईल, असे ठेकेदाराने सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात दीड महिना होऊनही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे भाजपचे शिष्टमंडळ प्रशासनाविरोधात चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, ठेकेदाराने दोन दिवसात पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती दिली.

Rahuri News
Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना, रिपाइं अन् मनसेचा 'पत्ता कट'

माजी खासदार प्रसाद तनपुरे (Prasad Tanpure) यांनीही नगरपालिका कार्यालयात भेट दिली. पाइपलाइनचे काम पाहणाऱ्या संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी त्यांनी केली. दोन दिवसांच्या आत काम पूर्ण करण्यासंदर्भाच्या सूचना केल्या. भाजपने घेराव आंदोलनानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरपालिका कार्यालयात गेल्याने राहुरीत चर्चेला उधाण आले आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Rahuri News
Dhule Lok Sabha Constituency : आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसला धुळ्यात 'एमआयएम' देणार शॉक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com