Dhule Lok Sabha Constituency : आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसला धुळ्यात 'एमआयएम' देणार शॉक?

Loksabha Election 2024 : सुरुवातीला उमेदवार देण्याबाबत अनुच्छुक असलेल्या 'एमआयएम' ने आता धुळे मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येथे आठवडाभरात 'एमआयएम' आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Congress-MIM
Congress-MIMSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 28 March : भाजपने धुळे मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली. त्याला आता आठवडा होऊन भामरे कामालाही लागले. मात्र, काँग्रेस अजूनही निद्रिस्त आहे. काँग्रेसकडून फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. काँग्रेसच्या नकाशात धुळे मतदारसंघ आहे की नाही, अशी शंका आता येऊ लागली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule Lok Sabha Constituency ) भाजपकडे (BJP) आठ ते दहा इच्छुक होते. डॉ. सुभाष भामरे यांची यंदा तिसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच नाराजी होती. अँटी इन्कमबन्सी असल्याने विविध इच्छुकांनी भामरे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, अनपेक्षितपणे भामरे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर न झाल्यानंतरही भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. भाजपच्या गोटात अशी अस्वस्थता असतानाच मतदारांमध्येही विद्यमान खासदारांबाबत फारसे चांगले वातावरण नसल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress-MIM
Madha Lok Sabha : माढ्यासाठी ‘देवगिरी-सागर’वर काथ्याकूट; मोहिते पाटलांची फडणवीसांशी, तर रामराजेंची अजितदादांशी चर्चा...

महाविकास आघाडीकडे धुळे मतदारसंघ काँग्रेस (Congress) पक्षाला सोडण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने येथे निवडणूक तयारीसाठी उत्तर महाराष्ट्राचा मेळावाही घेतला. मात्र, त्या मेळाव्यात कोणीही प्रबळ उमेदवार उपलब्ध झाला नाही. सध्या या पक्षाकडे केवळ नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम समीर वगळता अन्य नावे नाहीत. आमदार कुणाल पाटील हे अनुकूल वातावरण असूनही निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये वेगळीच शंका घेतली जात आहे. भाजपचा प्रचार सुरू झाला असला तरी काँग्रेस सुस्तच आहे.

धुळे मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या तीन निवडणुकांमध्ये येथे भाजपने सलग विजय मिळविला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपपुढे टिकाव लागावा, असा जनसंपर्क असलेला नेता किंवा उमेदवार काँग्रेसला मिळू शकलेला नाही. गेल्या तीन महिन्यांत या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी कोणतीही तयारी केलेली नाही. असे विदारक सत्य या निमित्ताने मतदारांमध्ये चर्चेत आहे. त्यामुळे अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेस उमेदवार देऊ शकत नाही, अशी नामुष्की या पक्षावर आली आहे.

Congress-MIM
Solapur Politics : सोलापूरवर वर्चस्व गाजवलेले मोहिते पाटील-शिंदेंच्या राजकीय वारसांची अस्तित्वासाठी लढाई

काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीतील पराभवासाठी सातत्याने अल्पसंख्याक समाजातील अपक्ष उमेदवार अथवा 'एमआयएम'च्या उमेदवारामुळे झालेल्या मत विभागणीचे कारण पुढे केले जाते. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षातच निरुत्साह आहे. त्याचा पुरेसा फायदा 'एमआयएम'कडून घेतला जाणार आहे. सुरुवातीला उमेदवार देण्याबाबत अनुच्छुक असलेल्या 'एमआयएम' ने आता धुळे मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येथे आठवडाभरात 'एमआयएम' आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. हा उमेदवार जाहीर झाल्यावर आधीच अवसान गळालेल्या काँग्रेसची काय गती होणार? अशी चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Congress-MIM
Amravati Lok Sabha Constituency : आता डायरेक्ट अन्‌ करेक्ट कार्यक्रम होईल; आक्रमक बच्चू कडूंचा राणांना कडक इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com