भाजप नगरसेविका म्हणते, निवडणूक लढेन... पण दुश्मनी करणार नाही!

नाशिक रोड भागातील प्रभाग २४ मध्ये प्रमुख इच्छुक उमेदवारांनी सहविचार सभा घेतली.
Seema Tajne, BJP Corporator
Seema Tajne, BJP CorporatorSarkarnama

नाशिक रोड : महापालिकेची (NMC) निवडणूक जशी जवळ येत आहे तशा राजकीय घडामोडी मोठ्या संख्येने घडत आहे. नाशिक रोड (Nashik) परिसरात नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग २४ मधील सर्वपक्षीय इच्छुकांनी एकत्र येऊन निवडणूक दुश्मनी विरहित लढवली जावी, यासाठी शपथ घेतली. निवडून कुणीही आले तरी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होण्याची शपथ या वेळी सर्वपक्षीय व अपक्ष इच्छुकांनी (Candidates) घेतली.

Seema Tajne, BJP Corporator
तरूणांनो, स्वतःचा उद्योग उभारून इतरांना नोकरीच्या संधी द्या!

महापालिका निवडणुकीच्या पूर्वी सर्व इच्छुक एकत्र येण्याची ही पहिलीच घटना आहे. हा कार्यक्रम मित्रमेळा सामाजिक संघटनेचे राजेंद्र ताजणे व भाजपच्या नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांनी आयोजित केला होता.

Seema Tajne, BJP Corporator
देविदास पिंगळेंनी शेतकऱ्यांचे थकलेले २५ लाख रुपये मिळवून दिले!

नाशिक रोड येथील कलानगर मधील झुलेलाल मंदिरात हा कार्यक्रम मित्रमेळा संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी मत मांडताना सांगितले, की निवडणूक ही केवळ पंधरा दिवसांची असते. प्रभागातील नागरिकांचे सामाजिक संबंध कायमस्वरूपी टिकत राहतात. निवडणुकांमध्ये विरोधक एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करतात. शिवाय अनेक वेळा मोठ गुन्हे घडतात.

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणीही उभे राहिले तरी तत्त्वाने विरोध व्हायला हवा. कायदा सुव्यवस्था सर्वांनीच राखायला पाहिजे. याशिवाय सामाजिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायला हवे. निवडणूक झाल्यानंतर सर्वांनी प्रेमाचे संबंध ठेवले पाहिजे, असे या वेळी इच्छुक उमेदवारांनी मत व्यक्त केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय, भाजप व अपक्ष इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या वेळी भाजपच्या नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, राजेंद्र ताजणे, राजेंद्र मोरे, सुनील चव्हाण, शिवा गाडे, नीलेश जाधव, वाल्मीक बागूल, मसूद जिलानी, समर्थ मुठाळ, योगेश नागरे, अरुण चव्हाण, संजय गायकवाड, रमेश आहेर, शशी चौधरी, हमीद शेख, निजाम सय्यद, आरिफ शेख, रमेश पाळदे, मधुकर पाटील, दत्ताजी आगळे, नय्युम खान, गुड्डू शेख, नितीन धानापुने, कन्हय्या पाटील, नितीन साळवे, जावेद सय्यद, सागर निकाळे आदी इच्छुक उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com