Nandurbar News पालकमंत्री अनिल पाटील यांची नियुक्ती गावित विरोधकांच्या पथ्यावर?

Whether Anil Patil`s appointment benifitial to Vijaykumar Gavit opponent-नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होईल का?
Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant RaghuwanshiSarkarnama
Published on
Updated on

Anil Patil as Guardian Minister : राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा नंदुरबार, धुळ्याच्या आदिवासी पट्ट्यातील राजकारणात विशेष प्रभाव आहे. त्याचा फायदा भाजपला होत आला आहे. गेले काही दिवस त्यांचे विरोधक आणि विशेषतः काँग्रेस येथे पुन्हा जम बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Vijaykumar Gavit has a key roll in Nadurbar District &Trible politics)

नंदुरबारच्या (Nandurbar) आदिवासी (Trible) राजकारणात डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचा विशेष प्रभाव आहे. त्यांची राजकारणावर पकड आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसला (Congress) जम बसविण्यासाठी धडपड सुरू आहे. गावित यांचे पालकमंत्रिपद गेल्याने काँग्रेसची वाट थोडी सोपी होऊ शकते.

Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Pankaja Munde : ‘वैद्यनाथ’ निधी संकलनातून पंकजा मुंडे यांनी राजकीय मैदान मारले!

नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची जागा आता अजित पवार गटाचे अनिल पाटील घेणार आहेत. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आहेत, तसेच गावित यांचे विरोधक एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी सख्य असलेले आहेत. त्यामुळे गावित यांच्या विरोधकांना हा दिलासा मानला जातो. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेला (शिंदे गट) बळ मिळेल, हे लपून राहिलेले नाही. नंदुरबार शहरासाठी आगामी राजकारण शिंदे गटाला सोयीचे होणार आहे.

उत्तर महाराष्ट्र तसेच ठाणे शहराच्या आदिवासी राजकारणाशी साम्य व जवळीक असलेले आदिवासी राजकारणाचे केंद्र म्हणून नंदुरबार जिल्ह्याकडे पाहिले जाते. या भागात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ताकद आजमावली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सध्याचे राजकारण अतिशय महत्त्वाच्या वळणावर पोहोचले आहे. त्यात डॉ. गावित हा भाजपचा चेहरा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) अशी महाविकास आघाडी मैदानात उतरेल. त्यांना अनिल पाटील हे सॉफ्ट कॉर्नर ठरतील का याची चर्चा आहे.

राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये जो-तो आपल्या सोयीचे राजकारण करीत आहे. त्यातूनच शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पालकमंत्री पदाबाबतच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांचा, की भाजप श्रेष्ठींचा निर्णय हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे या बदलामुळे अनिल पाटील अर्थात अजित पवार यांची सोय म्हणून पाहिले जाते. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसलाही येथे बळ मिळणार आहे. नवे पालकमंत्री पाटील व डॉ. गावित यांच्यातील समन्वयावर पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.

Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Nandurbar BJP NEWS : अंतर्गत सर्व्हेमुळे विजयकुमार गावित यांना भाजपने दूर केले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com