Ajit Pawar : ठाकरेंच्या सभेला तुम्ही गर्दी जमवली का? अजितदादांचे भन्नाट उत्तर; आमचाच माजी आमदार फुटला...

Ahmednagar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं
Ajit Pawar and Uddhav Thackeray
Ajit Pawar and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील राजकारण ढवळून निघालं आहे.

या सभेला तुफान गर्दी जमली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवली, अशी खोचक टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आता या टिकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ते अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानावरून सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.

Ajit Pawar and Uddhav Thackeray
Konkan News : रत्नागिरीत भास्कर जाधवांच्या जोडीला ठाकरे गटाला मिळाला आक्रमक नेता

पवार म्हणाले, ''विरोधक म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेला आम्ही गर्दी जमवली. पण आमचाच माजी आमदार संजय कदम फुटला आहे. संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला आणि आम्ही कशाला गर्दी जमवू?'', असं उत्तर देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

Ajit Pawar and Uddhav Thackeray
Abdul Sattar News : पंचवीस वर्षापासून सत्तार साजरी करतात बंजारा समाजासोबत होळी..

''बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना न देता एकनाथ शिंदे यांना दिली. पण महाराष्ट्रातील जनतेला हे आवडलेलं नाही'', असं म्हणत त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन, काद्यांचे दर, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी अनुदान अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com