राज्यमंत्री भारती पवार यांना कोण आव्हान देणार?

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आमदार नितीन पवार आणि नरहरी झिरवाळ यांची चाचपणी.
Narhari Zirwal & Bharti Pawar
Narhari Zirwal & Bharti PawarSarkarnama

नाशिक : राज्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून सत्तेचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिर्डी अधिवेशनानंतर राष्ट्रवादीकडून (NCP) लोकसभेची तयारी सुरु केल्याचे बोलले जाते. या स्थितीत दिंडोरी (Dindori Constituency) मतदारसंघात भाजपच्या (BJP) केंद्रीय राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना कोण आव्हान देणार? याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. (NCP Start prepration for Dindori Loksabha Constituency)

Narhari Zirwal & Bharti Pawar
Bharat Jodo Yatra : शेतकर्‍यांनी विम्यासाठी भरलेला पैसा जातो कुठे?, राहुल गांधींचा सवाल!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ किंवा कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या नावाची चाचपणी दिंडोरीत केली जात आहे.

Narhari Zirwal & Bharti Pawar
सभा काय रद्द करता, सुषमा अंधारेंच्या प्रश्नांना उत्तर द्या!

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीला सव्वादोन वर्षांचा कालावधी असला तरी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे.

राजकारणाच्या बदलत्या ट्रेंडमध्ये सर्वेक्षणाला महत्त्व आले असून, उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून नावे जाहीर करणे किंवा उमेदवारी निश्‍चिती केली जात. भारतीय जनता पक्षात या बाबी गांभीर्याने ध्यानात घेतल्या जातात. त्यापाठोपाठ आता इतर राजकीय पक्षांनी देखील बदलता ट्रेंड आत्मसात केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीला सव्वादोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्याअनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशन आटोपल्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, तसेच कळवणचे आमदार नितीन पवार या दोन नावांची चाचपणी केली जात आहे. कार्यकर्ते, मतदारांचे सर्वेक्षण आदी बाबी तपासल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार निश्‍चिती केली जाणार आहे. सर्वेक्षण किंवा चाचपणीच्या माध्यमातून कल लक्षात घेऊन त्यादृष्टीने राजकारणाची सूत्रे हलविण्याची खेळी खेळली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपला तोडीस तोड

निवडणुकीला सव्वादोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच तयारी करून भाजपला आव्हान निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ होता; परंतु २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला यश मिळाले. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्रिपद देऊन हा मतदारसंघ भक्कम करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे.

त्यासाठी भाजपच्या या खेळीला तोडीस तोड देण्याची योजना राष्ट्रवादीकडून आखली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यात प्रामुख्याने झिरवाळ यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com