Nashik News: जिल्हा परिषदेतील दोषी अधिकाऱ्यांवर वचक हवा!

जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले होते.
Prahar workers agitation at Nashik
Prahar workers agitation at NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेत (ZP) एका कामाची फाइल (Work praposals) पाच-पाच वर्षे इकडून तिकडे फिरत राहते. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी ठोस कार्यवाही न करता टाळाटाळ करतात. नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर (Officers) कारवाई होत नाही. जनहीतासाठी अशा अधिकाऱ्यांवर वचक हवा. मात्र दुसरीकडे परवानगी घेऊन आंदोलन केले तरी गुन्हे दाखल होतात. हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके (Dattu Bodake) यांनी सांगितले. (Zillha parishad administration negligent towards there duty)

Prahar workers agitation at Nashik
Congress News: `फॉक्सकॉन`विषयी ९० टक्के चर्चा झाली होती!

जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कामातील कथित अनियमितता व नियमबाह्य कामांचे वाटप व जिल्हाभरातील दिव्यांगांच्या प्रश्‍नाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्रहार जनशक्तीने केला आहे. त्याविरोधात मंगळवारी पक्षातर्फे जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निषेध आंदोलनात जिल्हाभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Prahar workers agitation at Nashik
Nashik News: नाशिक झाले यूपी- बिहार, पोलिसांचा वचक संपला?

गेल्या वर्षी तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांगांचे प्रश्‍न व समस्यांवर जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीचे निर्देश दिले होते. याबाबत संबंधितांना निवेदनही देण्यात आले होते; परंतु निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने मंगळवारी संघनटेतर्फे जिल्हा परिषद मुख्यालयाबाहेर निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली होती; परंतु पोलिस प्रशासनाने जिल्हा परिषद प्रवेशद्वाराऐवजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरच्या बाजूस शांततामय आंदोलनास परवानगी दिली.

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

दुपारच्या सुमारास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी जिल्हा रुग्णालयासमोरील आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार आगामी आठ-दहा दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत प्रहार संघटनेच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्‍वासन श्री. पिंगळे यांनी आंदोलकांना दिले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com